Bad Habits That Can Affect Liver: आपण आपल्या दैनंदिन जीवनात पोट, हृदय आणि डोळ्यांची चांगलीच काळजी घेतो. पण बऱ्याचदा लोक लिव्हरची काळजी घेणं विसरतात. लिव्हर आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव आहे. याच कारणाने या अवयवाची काळजी घेण्यासाठी काही आहारात बदल करण्याचा आणि काही सवयी बदलण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या रोजच्या काही चुकांमुळेही लिव्हरचं नुकसान होतं. चला जाणून घेऊ लिव्हरची काळजी घेण्यासाठी काय करावं.
अनेक हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, स्वत:ला क्रॉनिक डिजीजपासून वाचवायचं असेल तर आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्या. जे लोक असं करत नाहीत, त्यांचं शरीर हळूहळू कमजोर होऊ लागतं.
हे फूड्स खाल्ल्याने खराब होतं लिव्हर
आपण आपल्या चिभेचे चोचले पुरवण्यासाठी अनेकदा अशा गोष्टी खातो, ज्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान होतं. जर तुम्हाला हेल्दी लिव्हर हवं असेल तर रेड मीट, सोडा, सॉफ्ट ड्रिंक्स, दारू आणि तेलकट पदार्थ खाणं टाळलं पाहिजे.
या तीन सवयी सोडा
जर तुम्हाला वाटत असेल की, केवळ अनहेल्दी फूड्स खाल्ल्याने लिव्हर खराब होतं तर तुम्ही चुकीचा विचार करताय. आपण आपल्या डेली लाइफमध्ये काही अशा चुका करतो ज्यामुळे लिव्हरचं मोठं नुकसान होऊ शकतं. चला जाणून घेऊ तुम्ही काय टाळलं पाहिजे.
1) दिवसा झोपण्याची सवय
काही लोकांना दिवसा झोपण्याची वाईट सवय असते. दुपारी 10 ते 20 मिनिटांची पॉवर नॅप घेण्यास काही अडचण नाही. पण जर तुम्ही दिवसा खूप जास्त झोपत असाल तर हे लिव्हरसाठी फार नुकसानकारक ठरू शकतं.
2) रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय
काही लोकांना रात्री उशीरापर्यंत काम करण्याची किंवा लेट नाईट पार्टीज करण्याची सवय असते. अशात ते रात्री उशीरा झोपतात. हे लिव्हरच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं.
3) फार जास्त रागावणं
आपल्या रागावर कंट्रोल करणं ना केवळ मेंटल हेल्थसाठी गरजेचं आहे, सोबतच लिव्हरच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्यामुळे आपला मूड नेहमी चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा.