आपल्या शरीरातील हाडं मजबूत असणं गरजेचं आहे. हाडांमधील कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे अनेक आजार होतात. तसंत काही वयानंतर पुरुष व स्त्रियांमध्ये हाड कमकूवत होतात. आपल्या रोजच्या क्रिया करण्यासाठी हाडं शाबूत असणं फार महत्वाचं आहे. जाणून घेऊया कोणत्या कारणांमुळे हाडं कमकुवत होतात.
हालचालींचा अभाव- दिवसभर केवळ बसून राहिल्याने हाडांचे त्रास होण्याची शक्यता जास्त बळावते. खरंतर आपले स्नायू आणि हाडं मजबूत राहण्यासाठी व्यायाम करणं गरजेचे आहे. सध्याच्या वर्क फ्रॉम होममध्ये सर्वांची जवळजवळ अशीच परीस्थीती आहे. त्यामुळे घरातच राहणाऱ्या लोकांनी सकाळी किंवा संध्याकाळी चालणं, व्यायाम किंवा योगा करावा. त्यामुळे हाडं मजबूत राहतील.
मिठाचं जास्त प्रमाण- जेवणात मिठाचं प्रमाण जास्त असेल तर, त्याने देखील हाडांना धोका निर्माण होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते मिठामध्ये सोडियम असतं. जास्त प्रमाणामध्ये सोडियम शरीरात गेल्यामुळे बोन डेन्सिटी कमी होऊ लागते. आपल्या आहारामध्ये दिवसभरात केवळ १५० मिलीग्रॅम मीठ असायला हवं.
उन्हात जाण्यास टाळाटाळ-दिवसभर घरामध्ये राहिल्यामुळे हाडांची मजबुतीवर त्याचा परिणाम होतो. उन्हात गेल्याने व्हिटॅमीन डी मिळतं. विटामिन डीमुळे शरीरामध्ये कॅल्शियमचं शोषण वाढतं. त्यामुळे सकाळच्यावेळी घरांमधून बाहेर पडा. सकाळच्या कोवळ्या ऊन्हाने शरीराला व्हिटॅमीन डी मिळेल. याशिवाय विटामिन डीच्या सप्लिमेंट देखील घेऊ शकता.
हाडांसाठी कॅल्शियम-कॅल्शियमने हाडं मजबूत राहतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाड पातळ होऊन, कमजोर व्हायला लागतात. दूध,दही या सारख्या पदार्थांनी कॅल्शियम मिळतं त्यामुळे हे पदार्य़ आवडत नसतील तरी खा. त्याबरोबर कॅल्शियमची कमी दूर करण्यासाठी सप्लिमेंट घ्या.