शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

नकळत 'या' सवयींमुळे तुम्ही हृदयरोगांचे होत आहात शिकार, 'या' गोष्टींकडे कधी देतंच नाही लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 11:05 AM

या कॉमन गोष्टींकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला आयुष्यभरासाठी महागात पडू शकतं.

भारतात हृदयरोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. हा धोका खासकरून तरूणांमध्ये वाढतो आहे. डॉक्टर्स प्रामुख्याने स्ट्रेस आणि डिप्रेशनने वेढलेल्या लाइफस्टाईलला याचं कारण मानतात. अशाच काही कॉमन सवयी आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही नकळत हृदयरोगांच्या जाळ्यात अडकत चालले आहात. जर यावर वेळीच लक्ष दिलं नाही तर तुमच्यासाठी महागात पडू शकतं.

टीव्ही बघणे

(Image Credit : clinicaladvisor.com)

टीव्हीसमोर रोज ४ तासांपेक्षा अधिक बसून राहणाऱ्या लोकांमध्ये हार्ट आर्टरी डिजीज होण्याचा धोका ८० टक्क्यांनी अधिक असतो. एक्सपर्ट सांगतात की, भलेही तुमचं बॉडी वेट योग्य असेल, पण फार जास्त वेळ टीव्ही आणि कॉम्प्युटरसमोर बसून राहिल्याने ब्लड शुगर आणि फॅट्सवर वाईट प्रभाव पडतो. सामान्यपणे लोकांची सवय असते की, ८ ते ९ तास ऑफिसमध्ये काम करून घरी आल्यावर टीव्हीसमोर बसतात. हे हृदयाच्या आरोग्यासाठी घातक आहे. 

घोरण्याकडे दुर्लक्ष करणं

(Image Credit : msn.com)

घोरण्याकडे भलेही तुम्ही झोपेत अडसर टाकणाऱ्या आवाजाच्या दृष्टीने बघत असाल, पण ही फार गंभीर समस्या आहे. ही समस्या ऑब्सट्रक्टिव स्लीप अ‍ॅपनियाचा संकेत असू शकते. या स्थितीत झोपेत श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि बीपी वाढू शकतो. अशा लोकांनी हृदयरोग होण्याचा धोका चार पटीने अधिक असतो. लठ्ठ लोकांमध्ये हा धोका अधिक बघायला मिळतो. त्यामुळे तुमच्या घोरण्याच्या सवयीबाबत वेळीच डॉक्टरांना संपर्क साधा.

जास्त मद्यसेवन करणे

(Image Credit : health.harvard.edu)

वेगवेगळ्या रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, मद्याचं थोडं प्रमाण तुमच्या हृदयासाठी चांगलं ठरू शकतं. पण जास्त प्रमाणात मद्यसेवन कराल तर यांचा संबंध हाय ब्लड प्रेशरसोबत जोडला जातो. पुढे जाऊ याने हार्ट फेल होण्याचाही धोका असतो.

डेंटल प्रॉब्लेमवर लक्ष न देणे

(Image Credit : venemandentalcare.com)

हिरड्यांचं आरोग्य आणि हार्ट डिजीजचं खोलवर संबंध आहे. जर तुम्ही फ्लॉस वापरत नसाल तर बॅक्टेरिया आणि प्लाक जमा होत जाणार. याने हिरड्यांच्या वेगवेगळ्या समस्या होणार. पुढे जाऊन धमण्यांमध्ये प्लाक जमा होऊन हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.

जास्त खाणं

(Image Credit : theactivetimes.com)

ओव्हरवेट असणं हे हृदयासाठी फार धोकादायक असतं. हृदयरोग टाळायचे असतील आणि सोबतच लठ्ठपणाचे शिकार व्हायचे नसेल तर जास्त खाऊ नका, जास्त अन्न ताटात घेऊ नका, गोड पेयांऐवजी पाण्याचं अधिक सेवन करा. फास्टफूडचं अधिक सेवन कराल तर हृदयरोगाचा धोका टाळता येऊ शकत नाही.

मिठाचं अधिक सेवन

जेवढं जास्त मिठाचं सेवन तुम्ही कराल, तेवढं जास्त ब्लड प्रेशर वाढणार. कमी मिठाने पदार्थ भलेही वेगळे लागत असतील पण कमी मीठ खाल तर तुमचं हृदय निरोगी राहू शकतं. उगाच जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात जीव गमावून बसाल.

फळं आणि भाज्या न खाणं

हृदयासाठी सर्वात चांगला आहार म्हणजे प्लांट बेस्ड डाएट असते. याचा अर्थ आहारात फळं, भाज्या, कडधान्य, लो फॅट डेअरी प्रॉडक्ट्स, प्रोटीनचा समावेश करावा. जंकफूडपासून दोन हात दूर रहा. एका रिसर्चनुसार जे लोक एका दिवसात ५ किंवा त्यापेक्षा जास्त फळं आणि भाज्या खातात, त्यांना हृदयरोगाचा धोका २० टक्के कमी राहतो.

स्मोकिंग करणं-स्मोकिंग करणाऱ्यांसोबत राहणं

(Image Credit : kxan.com)

स्मोकिंगच्या नुकसानांबाबत तुम्ही अनेकदा वाचलं असेलच. पुन्हा एकदा जाणून घ्या की,  स्मोकिंग तुमच्या हृदयासाठी घातक आहे. स्मोकिंगमुळे ब्लड क्लॉट म्हणजेच रक्ताच्या गाठी तयार होता, ज्यामुळे हृदयाला होणारा रक्तप्रवाह रोखला जातो. हाय बीपी, कोलेस्ट्रॉल, डायबिटीस, ओव्हरवेट होणे या समस्या स्मोकिंगमुळे होतात.

डिप्रेशनकडे दुर्लक्ष करणं

(Image Credit : spbh.org)

जर तुम्हाला नेहमीच उदास किंवा डिप्रेस वाटत असेल तर याचा प्रभाव तुमच्या हृदयावर पडतो. आज आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं. तुम्ही या इमोशन्सना कसं डील करता, हे तुमच्या हृदयाच्या आरोग्याला प्रभावित करतं. त्यामुळे डिप्रेशन किंवा चिंतेकडे दुर्लक्ष करू नका.

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्स