सुंदरता केवळ चेह-याने असते असं नाहीये. तुमचे दात स्वच्छ नसेल तर तुमचं फर्स्ट इम्प्रेशन हे लास्ट ठरु शकतं. सुंदर आणि स्वच्छ दातांची स्माईल जास्त चांगली वाटते. अनेक लोकांचे दात वेगवेगळ्या कारणांनी पिवळे असतात. आजकालच्या काही चुकीच्या खाण्यामुळे आणि काही चुकीच्या सवयींमुळे दात पिवळे होतात. पाण्यातील केमिकल्स, तंबाखू आणि कलर्ड पदार्थ खाल्ल्यानेही दातांवर पिवळेपणा येतो. दात चमकवण्यासाठी मार्केटमध्ये शेकडो प्रोडक्ट मिळतील, पण त्यातील केमिकलमुळे हिरड्यांना धोका होऊ शकतो. जर तुम्हाला चमकदार दात हवे असतील तर काही घरगुती उपायही करु शकतात.
बेकींग सोडा -
बेकींग सोडा थोडा जाड आणि खरबडीत असतो. त्याने दातांवर स्क्रब केलं जाऊ शकतंय. याचा वापर तुम्ही लिंबूसोबत करु शकता. लिंबूचा रस सायट्रिक अॅसिड असतं, जे ब्लिचिंगसारखं काम करतं. त्यामुळे या दोन्हींचा वापर एकत्र केल्यास दात चांगले चमकदार होतील.
असा करा बेकींग सोड्याचा वापर
एक चमचा बेकींग सोडा घ्या आणि याची पेस्ट करण्यासाठी यात लिंबाचा रस टाका. ही पेस्ट ब्रशने दातांवर लावा आणि एक मिनिटांसाठी तसाच ठेवा. त्यानंतर चांगल्याप्रकारे तोंड धुवा.
दातांना चमकदार करण्यासाठी हेही उपाय
1) स्ट्रॉबेरी -
स्ट्रॉबेरीचे काही तुकडे बारीक करुन ती पेस्ट दातांवर लावून मसाज करा. दिवसातून दोनदा असे केल्यास दातांचा पिवळेपणा जातो.
2) संत्र्याची साल
संत्र्याच्या सालीने दात साफ केल्यास काही दिवसातच पिवळेपणा जाऊन दात चमकायला लागतात. यासाठी रोज रात्री झोपताना संत्र्याची साल दातांवर घासा. संत्र्याच्या सालमध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअम असतं. जे दातांची चमक आणि मजबूती कायम ठेवतं.
3) लिंबू
लिंबूचे नैसर्गिक ब्लिचींग गुणधर्म दातांवरही उपायकारक ठरतात. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी लिंबाची साल दातांवर घासावी. लिंबू आणि मिठ एकत्र करुन दातांची मसाज करा. असे दोन आठवडे केल्यास दातांचा पिवळेपणा जाणार.
4) खोब-याचं तेल
खोब-याचं तेल किंवा तिळाच्या तेलाने दात साफ करणे ही एक आयुर्वेदिक पद्धत आहे. एक चमचा खोब-याचं तेल दातांवर लावा. आठवड्यातून दोनदा असे केल्यास फायदा होईल.