मजबूत हाडांसाठी आहारातून कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी घेण्याची गरज असते हे सर्वांना माहीत आहे. पण काही असेही पदार्थ आपल्या खाण्यात येतात ज्यांमुळे हाडे कमजोर होतात. वेगवेगळ्या पदार्थांमधून असे काही तत्व आपल्या शरीरात जातात की, त्यांनी हाडे कमजोर होतात. चला जाणून घेऊ त्या तत्वांबाबत...
सोडियमचं अधिक प्रमाण
मिठामुळे शरीरातील सोडियमचची कमतरता पूर्ण होते. पण जास्त सोडियन सुद्धा शरीरासाठी हानिकारक होऊ शकतं. सोडियमच्या अधिक प्रमाणामुळे लघवीच्या मार्गातून कॅल्शिअम बाहेर जाऊ लागतं. त्यामुळे तुम्हाला जर हाडे निरोगी ठेवायची असेल तर आहारातून जास्त सोडियम सेवन करु नये.
अल्कोहोलही नुकसानकारक
अल्कोहोलचं अधिक प्रमाण हे शरीरासाठी घातक आहे. अल्कोहोल जास्त सेवन केल्याने हाडांचं नुकसान होतं. याचा प्रभाव हाडांवर इतका पडतो की, थोडासा झटका लागला तरी हाडे तुटू शकतात.
प्रोसेस्ड फूड
प्रोसेस्ड फूडही हाडांसाठी फार हानिकारक आहेत. कारण या पदार्थांमध्ये सोडियमचं प्रमाण अधिक असतं आणि जास्त सोडियम हाडांसाठी चांगलं नसतं. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या बंद पॅकेटमधील फूड सेवन करणे टाळा.
बेकरी फूडनेही होतं नुकसान
बेकरी फूड टेस्टसाठी जरी चांगले असले तर यात शुगर आणि अनेकप्रकारचे हानिकारक तत्व असतात. जे शरीरातील हाडांना पोषक तत्त्व देण्याऐवजी त्यांना कमजोर करतात. त्यामुळे हाडांची काळजी घ्यायची असेल तर बेकरी फूड कमी प्रमाणात सेवन करा.
कार्बोनेटेड ड्रिंक
कार्बोनेटेड ड्रिंक प्यायला टेस्टी असतात पण याचे शरीरावर अनेक गंबीर परिणामही होतात. याने हाडांचं आरोग्य बाधित होतं. या ड्रिंकमध्ये फॉस्फोरसचं प्रमाण अधिक असतं. याने कॅल्शिअम हाडांमधून बाहेर निघतं आणि हाडे कमजोर होतात. व्हिटॅमि एआपणा सर्वांना हे माहीत आहे की, आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन किती महत्त्वाचे आहेत. खासकरुन व्हिटॅमिन ए दात, हाडे, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फार गरजेचं असतं. व्हिटॅमिन ए हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे हे खरं असलं तरी व्हिटॅमिन ए जास्त झालं तर व्हिटॅमिन डी वर मात करुन हाडांना नुकसान पोहोचवू शकतं.