Headache in winters : हिवाळ्यात फिरण्याची, मस्ती करण्याची आणि खाण्या-पिण्याची आपलीच एक वेगळी मजा असते. कारण या दिवसात वातावरण थंड आणि फारच हेल्दी असतं. पण हेही नाकारता येत नाही की, याच दिवसांमध्ये सगळ्यात जास्त सर्दी-खोकला, फ्लू, श्वासासंबंधी समस्या होतात.
सोबतच हिवाळ्यात डोकेदुखीची समस्याही खूप लोकांना होते. ज्यामुळे दिवसभराची कामे व्यवस्थित होत नाहीत. ही डोकेदुखी अशी असते जणू डोक्यात बॉम्ब फुटत आहेत. या समस्येकडे दुर्लक्ष केलं तर मोठी अडचण होऊ शकते.
डोकेदुखी आणि थंडीचा संबंध
अमेरिकन मायग्रेन फाउंडेशननुसार, थंड वातावरण आणि कमी उन्हामुळे बॅरोमेट्रिक प्रेशर बदलतं. ज्याकारणाने ब्लड प्रेशर बदलून डोकेदुखी, मायग्रेनचं कारण बनू शकतं. त्याशिवाय थंड हवा मेंदुच्या नसा आणि रक्त वाहिन्यांना संकुचित करतात, ज्यामुळे डोकेदुखीची समस्या वाढते.
दिवस लहान असणं हेही कारण
हिवाळ्यात दिवस लहान असल्यानेही डोकेदुखीची समस्या होते. मोठ्या रात्री आणि दिवस लहान असल्याने आपलं झोपण्या-उठण्याचं सर्कल बदलतं. ज्यामुळे डोकेदुखी वाढते.
थंडीच्या दिवसात हीटर-ब्लोअरसारखे इनडोर हीटींग टूल्समुळे बॉडी डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. ज्यामुळे मेंदू आकुंचन पावतो आणि अमेरिकन मायग्रेन फाउंडेशननुसार ही स्थिती डोकेदुखीचं कारण बनू शकते.
हिवाळ्यात घर गरम ठेवण्यासाठी रूम हीटर्स लावल्याने आणि खिडक्या-दरवाजे बंद असल्याने व्हेंटिलेशन योग्यपणे होत नसल्याने रूममध्ये कार्बन मोनोऑक्साइड गॅस जमा होते. जो डोकेदुखीचं कारण बनतो.
सूप प्यायल्याने वाढते डोकेदुखी
थंडीच्या दिवसात स्वत:ला गरम ठेवण्यासाठी अनेकदा लोक बाजारातील सूप, नूडल्ससारखे पदार्थ खातात. ज्यात मोनोसोडियम ग्लूटामेट असतं. ज्यामुळे अनेकदा हिवाळ्यात डोकेदुखी होते. म्हणून हिवाळ्यात हे पदार्थ कमी खावेत.
कसा कराल बचाव
- हिवाळ्यात जेव्हाही बाहेर जाल तेव्हा स्वत:ला गरम कपड्यांनी कव्हर करा. खासकरून डोकं.
- भरपूर पाणी प्यावे
- व्हिटॅमिन डी असलेली फळं भरपूर खावीत
- पुरेशी झोप आणि हेल्दी डाएटवर फोकस करा
- नियमितपणे एक्सरसाइज करा
- जास्त कॅफीन जसे की, कॉफी, चहा, एनर्जी ड्रिंक्स टाळा.