दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी आपला रक्तदाब नॉर्मल राहणं आवश्यक आहे. उच्च रक्तदाब (High BP) इतर अनेक समस्यांना जन्म देऊ शकतो. सततच्या उच्च रक्तदाबाला हायपरटेन्शन (Hypertension) असंही म्हणतात. यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते आणि आपल्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. उच्च रक्तदाबामुळे ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. हृदयासोबतच उच्च रक्तदाब शरीराच्या इतर भागांसाठीही घातक आहे. शंका असल्यास रक्तदाब नियमितपणे तपासत राहणे गरजेचे आहे.
औषधोपचारांव्यतिरिक्त आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करून उच्च रक्तदाब नियंत्रित केला जाऊ शकतो. यासोबतच वजन नियंत्रित करून, मिठाचे सेवन मर्यादित करून जीवनशैलीतील सकारात्मक फिटनेस सवयींसह रक्तदाब नियंत्रित केला जाऊ शकतो. काही पदार्थ आहेत जे रक्तदाब नियंत्रित (High blood pressure) ठेवण्यास मदत करतात. 'जागतिक आरोग्य दिना'च्या (World Health Day 2022 ) निमित्ताने, कोणकोणत्या पदार्थांद्वारे तुम्ही उच्च रक्तदाब नॉर्मल ठेवू शकता, जेणेकरुन तुमचे एकंदर आरोग्य चांगले राहील याविषयी जाणून घेऊया.
रक्तदाब कमी करणारे पदार्थMedicineNet.com मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, उच्च रक्तदाब ही अलिकडील कॉमन आरोग्य समस्या आहे, ज्यामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, किडनी खराब होणे, दृष्टी समस्या, स्मरणशक्तीशी संबंधित समस्या होण्याची शक्यता वाढते. रक्तदाब लवकर कमी करायचा असेल तर कॅफीन, सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थांचे जास्त सेवन टाळा. आहारात संपूर्ण धान्य, फळे, भाज्या आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. उच्च रक्तदाब व्यवस्थापित करण्यासाठी हे सर्व प्रभावी मार्ग आहेत.
बिया, नट्स आणि शेंगाभोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश केल्यानं उच्च रक्तदाब नियंत्रित केला जाऊ शकतो. त्यामध्ये अमिनो अॅसिड, पोटॅशियम, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे रक्तदाब कमी करण्यास मदत होते. नट्समध्ये पिस्ता रक्तदाब कमी करून हृदयाच्या आरोग्यास मदत करतात. त्यात पोटॅशियम देखील असते, जे उच्च रक्तदाब कमी करते. यासोबतच बीन्स आणि शेंगा यांचाही आहारात समावेश करावा.
अनसॅचुरेटेड फॅट्सऑलिव्ह ऑईल, सोयाबीन तेल यांसारख्या निरोगी असंतृप्त चरबीचा वापर उच्च रक्तदाब व्यवस्थापित करण्यात खूप मदत होते. आहारात या तेलांचा समावेश करता येईल.