Cholesterol In Winter : कोलेस्ट्रॉल काय असतं आणि त्याचे शरीराला काय नुकसान होतात हे जवळपास आजकाल बऱ्याच लोकांना माहीत असतं. कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग किंवा हार्ट अटॅकचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉल हा एक रक्तवाहिन्यांमध्ये जमा होणारा एक मेणासारखा पदार्थ असतो. नसांमध्ये हा जमा झाल्याने रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. शरीरात याचं प्रमाण वाढणं फारच घातक मानलं जातं.
कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचं असतं. एक म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल आणि दुसरं म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल. दोन्हींचं प्रमाण शरीरात असंतुलित झालं तर वेगवेगळ्या समस्या होता. बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका असतो. हिवाळ्यात काही खास खाद्यपदार्थ असे असतात ज्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. त्यामुळे पदार्थांचं सेवन काळजीपूर्वक केलं पाहिजे.
हिवाळ्यात वेगवेगळ्या कारणांमुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. ज्यात आहार, जीवनशैली आणि जेनेटिक्स यांचाही समावेश आहे. थंडी थेट कोलेस्ट्रॉल वाढण्याचं कारण ठरत नाही. काही पदार्थ यासाठी कारणीभूत ठरतात. ते कोणते हेच आज जाणून घेणार आहोत.
कोणते पदार्थ वाढवतात कोलेस्ट्रॉल?
जेव्हा तापमान कमी होतं तेव्हा शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी तळलेले आणि कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाण्याची ईच्छा होते. अशात हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी कोणते पदार्थ कारणीभूत ठरतात हे जाणून घेऊ.
तूप
हिवाळ्यात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये तूपाचा वापर केला जातो. एक्सपर्ट सांगतात की, तूपाने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच यात हेल्दी फॅटही असतं. मात्र, या दिवसात तूपाचं जास्त सेवन केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. जर तुम्ही या दिवसांमध्ये नियमितपणे एक्सरसाईज केली नाही तर हा धोका अधिक वाढतो.
लोणी
लोण्याचा वापरही वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. मात्र, याच्या जास्त सेवनाने शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका अधिक असतो. बाजारात मिळणाऱ्या लोण्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण अधिक असतं.
पनीर
पनीरचे वेगवेगळे पदार्थ भारतीय लोक रोज खातात. पालक पनीर, पनीर टिक्का, पनीर मसाला असे अनेक पदार्थ लोक आवडीने खातात. मात्र, हिवाळ्यात याच्या अधिक सेवनाने शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचा अधिक धोका असतो.
रेड मीट
गरम असल्याने हिवाळ्यात रेड मीटचं अधिक सेवन केलं जातं. मात्र, या सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात असतं. ज्यामुळे हृदयासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा धोका वाढू शकतो.
तळलेले पदार्थ
भारतातील लोक रोज नाश्त्यामध्ये समोसे, कचोरी, वडे, भजी असे तळलेले पदार्थ खातात. हिवाळ्यात हे पदार्थ अधिक खाल्ले जातात. ज्यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक वाढतं.