आपण सर्वांना हे चांगलंच माहीत आहे की, शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी फळं आणि भाज्यांचं सेवन केलं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही दोन वेगवेगळी फळं एकत्र खात असाल तर ते एकत्र खावे कि नाही हे जाणून घेणं गरजेचं ठरतं. काही फळांबाबत असं असतं की, ते एकत्र खाता येत नाहीत. किंवा ते एकत्र खाल्यास शरीरासाठी घातक ठरु शकतात. इतकेच नाहीतर काही गंभीर आजारांचाही सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया कोणती फळं एकत्र खाऊ नये आणि का खाऊ नये.....
संत्री आणि गाजर
संत्री आणि गाजर ही दोन फळं कधीही एकत्र खाऊ नये. ही फळं एकत्र खाल्याने छातीत जळजळ होण्याची शक्यता असते. सोबतच किडनीचीही समस्या होऊ शकते.
पपई आणि लिंबू
पपई आणि लिंबूचं एकत्र खाल्याने अनीमिया(रक्त कमी होणे) होण्याची शक्यता असते. त्यासोबतच शरीराचा हिमोग्लोबिनही असंतुलित होतो. लहान मुलांवर याचा जास्त परिणाम बघायला मिळतो.
पेरू आणि केळी
पेरू आणि केळी दोन्ही फळं आरोग्यासाठी फार लाभदायक आहेत. पण जर ही दोन्ही फळं एकत्र खाल्लं तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. ही दोन्ही फळं एकत्र खाल्यास आम्ल-पित्त, मळमळ होणे, गॅसची समस्या आणि डोकेदुखीसारखी समस्या होते.
संत्री आणि दूध
दूध आणि संत्री एकत्र खाल्यास पचनक्रियेवर प्रभाव पडतो. यामुळे खाल्लेले पदार्थ पचन होण्यास अडचण होते. सोबतच आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या समस्या होतात. जर तुम्ही दूध किंवा दुधाच्या पदार्थांमध्ये संत्री टाकत असाल तर याने अपचनाचा त्रास होतो.
अननस आणि दूध
(Image Credit: www.dhakatribune.com)
अननसामध्ये असलेलं ब्रोमेलेन जेव्हा दुधात मिश्रित होतं तेव्हा गॅस, मळमळ होणे, इन्फेक्शन, डोकेदुखी आणि पोटदुखीसारख्या समस्या होतात.
फळं आणि भाज्या
फळं आणि भाज्या एकत्र खाऊ नये कारण फळांमध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं. याने पचन होण्यास अडचण निर्माण होते. डायजेशनच्या प्रक्रियेवेळी फळांचं पचन