(Image Credit: KevinMD.com)
हार्ट अटॅक हा आजार किती गंभीर आहे हे आता कुणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. हार्ट अटॅक आधी वयाने मोठ्या लोकांनाच व्हायचा असा एक समज होता. पण आता कमी वयातही हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो. अनेक अशी प्रकरणे समोर आली आहेत ज्यात कमी वयातही हार्ट अटॅकमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे असं कशामुळे होतंय याची काही कारणे तज्ज्ञांनी सांगितली आहेत. चला जाणून घेऊया काय आहेत ती कारणे....
लाइफस्टाइलमधील बदल
आजची लाइफस्टाइल तरुणांमध्ये वेगवेगळ्या आजारांचं कारण ठरत आहे. एकाच जागी बसून काम करण्याची सवय, जंक फूड, फास्ट फूड, पुरेशी झोप न घेणे, मद्यसेवन आणि धुम्रपान यामुळे कमी वयाच्या तरुणांनाही हार्ट अटॅकचा सामना करावा लागत आहे. यातील काहींना तर उपचार घेण्याचीही संधी मिळत नाही आणि ते जीव गमावून बसतात. कमी वयात हार्ट अटॅकचं कारण जेनेटिक असतं, आणि आताची खराब लाइफस्टाइल हा आजार आणखी वाढवतात.
सिगारेटची सवय
धुम्रपान हे हृदयासाठी किती घातक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. याने हार्ट अटॅकचा धोका अधिक वाढतो. जर तुम्हाला ही सवय असेल ती लगेच सोडाय कारण सिगारेटमुळे आणि त्यातील तंबाखूमुळे शरीरातील ऑक्सिजनवर नकारात्मक प्रभाव पडतो. सोबतच तंबाखूमुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. धुम्रपान आणि मद्य यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त वाढतं. त्यामुळे हार्ट अटॅक येतो.
टेंशन आणि अपयशाचा दबाव
तणाव हा हृदयासाठी फारच घातक असतो. डिप्रेशनमुळे हृदयाचा आजार गंभीर रूप धारण करतो. अनेकदा हे जीवघेणंही ठरू शकतं. एका शोधानुसार, हृदय रोगाच्या प्रत्येक 5 रुग्णांपैकी एकाला गंभीर डिप्रेशनची समस्या असते. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, राग, चिडचिड यामुळे रक्तदाब वाढतो. डिप्रेशनने ग्रस्त लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता 4 पटीने जास्त असते.
शारीरिक मेहनतीची कमतरता
आपल्या शरीरासाठी जितका आहार गरजेचा असतो तितकाच त्या आहारामुळे मिळालेल्या ऊर्जेचा योग्य वापर करणं गरजेचं असतं. हृदय निरोगी ठेवण्यासाठी दिवसभरात 500 ते 950 कॅलरीज बर्न करण्यासाठी योग्य प्रमाणात शारीरिक हालचाल महत्वाची असते. जर तुम्ही शरीराची फार हालचालच करत नसाल तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम नाही केल तरी शारीरिक हालचाली होणं गरजेचं आहे.
वजन वाढणं
जर तुम्हाला हृदयाशी संबंधित रोगांना दूर ठेवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला वजन कमी ठेवायला हवं. जाडपणा ही सवय नाहीये, हा चुकीचं खाणं-पिणं आणि अंसतुलित जीवनशैलीचा परिणाम आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, जाडेपणा उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि इन्सुलिन रेजिस्टेंस यांचं नेतृत्व करतो. याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
चुकीचं खाणं-पिणं
कमी कोलेस्ट्रॉल असलेला आहार हृदयाचा सर्वात चांगला मित्र असतो. ट्रान्स फॅटमुळे हृदय रोगाची समस्या अधिक वाढते. ओमेगा -3 फॅटी अॅसिडने भरपूर पदार्थ हृदय रोगाची शक्यता कमी करतात. फास्ट फूडच्या सेवनामुळे हृदय रोगाची शक्यता अधिक वाढते.