High Cholesterol: शरीरात दोन पद्धतीचे कोलेस्ट्रॉल असतात. एक बॅड आणि एक गुड. गुड कोलेस्ट्रॉल शरीराच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी महत्वाचं असतं. पण बॅड कोलेस्ट्रॉलमुळे शरीरात वेगवेगळे आजार घर करू शकतात. यामुळे हृदयरोगांचा धोका सगळ्यात जास्त वाढतो. बॅड कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा झाल्याने रक्त पुरवठा सगळीकडे व्यवस्थित होत नाही. अशात बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणं किंवा ते शरीरात वाढू न देणं हे महत्वाचं आहे. बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक गोष्टी आपल्या किचनमध्येच असतात. पण अनेकांना त्या माहीत नसतात. त्यात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
वेगवेगळ्या बीया
वेगवेगळ्या बियांचं वेगवेगळ्या पद्धतीने आपणं सेवन करतो. या बियांमध्ये शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता असते. या बियांमध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि फायबर भरपूर असतं. भोपळ्याच्या बीया, सूर्यफूलाच्या बीया, अळशीच्या बीया आणि चिया सीड्स आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. या बियांच्या सेवनाने हाय कोलेस्ट्रॉलची समस्या दूर करण्यास मदत मिळू शकते.
पाणी आणि मध
एक कप गरम पाण्यात मध टाकून सेवन करू शकता. शरीरात जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल याने कमी होण्यास मदत मिळते. या पाण्यात मधासोबत थोडा लिंबाचा रस टाकल्यास फायदा अधिक मिळेल.
कच्चा लसूण
रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कच्चा लसूण खूप फायदेशीर ठरतो. अनेक एक्सपर्ट सांगतात की, रोज सकाळी एक किंवा दोन लसणाच्या कच्च्या कळ्या खाल्ल्यास फायदा मिळेल. मात्र तुम्ही जर काही आजारांची औषधे घेत असाल तर हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
फायबर फायदेशीर
फायबर भरपूर असलेल्या पदार्थांचं सेवन केल्यानेही तुम्हाला फायदा मिळू शकतो. अशात तुमच्या रोजच्या आहारात फायबरचा समावेश करा. फायबर मिळवण्यासाठी तुम्ही बदाम, ओट्स, सफरचंद, पेरू इत्यादींचं सेवन करू शकता.