अलिकडच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आहारात बराच बदल झाला आहे. शरीराला आवश्यक ते पौष्टिक तत्व आहारातून मिळतच नाहीये. याचाच परिणाम म्हणजे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या. यात सर्वात जास्त फटका बसतो, तो हाडांना. काही आहाराच्या बदलत्या आपल्या सवयींमुळे हाडे कमजोर होत आहेत. वेगवेगळ्या पदार्थांमधून असे काही तत्व आपल्या शरीरात जातात की, त्यांनी हाडे कमजोर होतात. चला जाणून घेऊ त्या तत्वांबाबत...
मिठाने शरीरातील सोडियमची कमतरता पूर्ण होते. पण जास्त प्रमाणात सोडियमचं सेवन सुद्धा शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. सोडियमच्या अधिक प्रमाणामुळे लघवी मार्गातून कॅल्शिअम बाहेर जाऊ लागतं. त्यामुळे तुम्हाला जर हाडे निरोगी ठेवायची असतील तर आहारातून जास्त सोडियम सेवन करु नये.
अल्कोहोलही नुकसानकारक
(Image Credit : nbcnews.com)
अल्कोहोलचं अधिक प्रमाण हे शरीरासाठी घातक आहे. अल्कोहोल जास्त सेवन केल्याने हाडांचं नुकसान होतं. याचा प्रभाव हाडांवर इतका पडतो की, थोडासा झटका लागला तरी हाडे तुटू शकतात.
प्रोसेस्ड फूड
(Image Credit : consumerreports.org)
प्रोसेस्ड फूडही हाडांसाठी फार हानिकारक आहेत. कारण या पदार्थांमध्ये सोडियमचं प्रमाण अधिक असतं आणि जास्त सोडियम हाडांसाठी चांगलं नसतं. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या बंद पॅकेटमधील फूड सेवन करणे टाळा.
बेकरी फूडनेही होतं नुकसान
बेकरी फूड टेस्टसाठी जरी चांगले असले तर यात शुगर आणि अनेकप्रकारचे हानिकारक तत्व असतात. जे शरीरातील हाडांना पोषक तत्त्व देण्याऐवजी त्यांना कमजोर करतात. त्यामुळे हाडांची काळजी घ्यायची असेल तर बेकरी फूड कमी प्रमाणात सेवन करा.
सॉफ्ट ड्रिंक
कार्बोनेटेड ड्रिंक प्यायला टेस्टी असतात पण याचे शरीरावर अनेक गंभीर परिणामही होतात. याने हाडांचं आरोग्य बाधित होतं. या ड्रिंकमध्ये फॉस्फोरसचं प्रमाण अधिक असतं. याने कॅल्शिअम हाडांमधून बाहेर निघतं आणि हाडे कमजोर होतात.
व्हिटॅमिन ए
Image Credit : holistickenko.com)
आपणा सर्वांना हे माहीत आहे की, आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन किती महत्त्वाचे आहेत. खासकरुन व्हिटॅमिन ए दात, हाडे, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फार गरजेचं असतं. व्हिटॅमिन ए हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे हे खरं असलं तरी व्हिटॅमिन ए जास्त झालं तर व्हिटॅमिन डी वर मात करुन हाडांना नुकसान पोहोचवू शकतं.