अनेकदा आपल्याला अंगदुखी, गुडघेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. सततच्या त्रासामुळे कामामध्ये मन लागत नाही. अनेकदा यामागे आपल्याकडून दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या चुकांचा परिणाम असतो. पंरतु हे दुखणं जर जास्त त्रास देत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या नाहीतर कधीकधी या साध्या वाटणाऱ्या समस्यांचं गंभीर समस्यांमध्ये रूपांतर होऊ शकतं.
आपल्या जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. काही लोक फ्रिजमधील थंड पाणी पितात. ज्यामुळे तुमच्या शरीराला फायद्यांऐवजी नुकसान होतं. जास्त थंड पाणी प्यायल्याने आतडी सुकून जातात. त्यामुळे साधं पाणी पिणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं.