Natural Blood Thinner: आजकाल लोकांमध्ये हृदयरोगांचा धोका खूपच वाढला आहे. सोबतच लठ्ठपणा आणि अनेक प्रकारच्या इतर आजारांमुळेही रूग्णांची संख्या वाढत आहे. याला कारण बदलती लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आहेत. हार्ट अटॅक (Heart Attack) आणि स्ट्रोक (Stroke) च्या रूग्णांबाबत सांगायचं तर हे लोक रक्त पातळ करण्यासाठी अनेक औषधांचा वापर करतात. ज्यांना ब्लड थिनरच्या नावानेही ओळखलं जातं. या औषधांनी ब्लड क्लॉटिंगची शक्यता कमी होते. जर तुम्हालाही ब्लड क्लॉटिंग किंवा रक्त घट्ट झाल्याची समस्या असेल तर खाली काही नॅच्युरल उपाय देत आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही रक्त पातळ करू शकता. पण हे उपाय करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
ब्लड क्लॉटिंगने जाऊ शकतो जीव
ब्लड क्लॉटिंग ही एक गंभीर समस्या आहे. ब्लड क्लॉटिंगला सायलेंट किलर असंही म्हटलं जातं. ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. धूम्रपान, हाय ब्लड प्रेशर आणि काही औषधं जसे की, एस्ट्रोजन हे रक्ताच्या गाठी तयार करण्याला कारणीभूत असतात.
डाएटमध्ये या पदार्थांचा करा समावेश
1) लसूण - लसूण शरीरातील घट्ट रक्त किंवा रक्ताच्या गाठी पातळ करू शकतो. यात असलेले एंटीथ्रॉम्बोटिक तत्व रक्त पातळ करण्याचं काम करतात. यामुळे शरीरात ब्लड क्लॉटिंग म्हणजे रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत. लसणाकडे नॅच्युरल अॅंटी-बायोटीक म्हणूनही वापरलं जातं.
2) लाल तिखटाचा वापर तर देशातील सगळ्याच किचनमध्ये केला जातो. हे पदार्थांची चव वाढवण्यासोबत आरोग्यासाठीही फायदेशीर असतं. यात असलेलं सॅलिसिलेट्स आरोग्यासाठी फार फायदेशीर असतं. लाल तिखटानेही रक्त पातळ करण्यास मदत मिळते. तसेच याने तुमचं हाय ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं.
3) रक्त पातळ करण्यासाठी तुम्ही आल्याचाही औषधासारखं वापर करू शकता. आल्यामध्ये एस्पीरिन सॅलिसिलेट सिंथेटिक गुण आढळून येतात. जे रक्त पातळ करण्यास मदत करतात. याचं सेवन तुम्ही चहासोबतही करू शकता.
(टिप - वरील लेखातील सल्ले हे सामान्य माहितीवर आधारित आहेत. यात आम्ही कोणताही दावा करत नाहीत. तुम्हाला रक्तासंबंधी काही समस्या असेल आणि हे उपाय करायचे असतील तर आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.)