Heart Inflammation: अनेक लोकांना नेहमीच छातीत वेदना, जळजळ आणि श्वास घेण्याची समस्या होत असते. अशात जर तुम्हीही या समस्येकडे पुन्हा पुन्हा दुर्लक्ष केलं तर तुम्हाला हे महागात पडू शकतं. तुम्हाला माहीत नसेल, पण हे हृदयावर सूज आल्याचे संकेत असू शकतात. ही हृदयासंबंधी एक गंभीर समस्या आहे. कारण हार्टवर सूज आल्याने तुम्हाला हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारखी समस्याही होऊ शकते. हृदयावर सूज आली तर आपलं शरीर काही संकेत देऊ शकतं. ज्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नये. असे काही संकेत दिसले तर लगेच डॉक्टरांना संकेत करा. चला जाणून घेऊ याची काही लक्षण.
थकवा जाणवणे
जर तुम्हाला नेहमीच थकवा जाणवत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. कारण हे हृदयावर सूज आल्याचा एक संकेत असू शकतो.
चक्कर येणे
अनेक लोकांना नेहमीच चक्कर येण्याची समस्या होत असते. ज्याकडे ते दुर्लक्ष करतात. पण असं करणं महागात पडू शकतं. कारण हे हृदयावर सूज आल्यामुळेही होऊ शकतं.
शरीराच्या अवयवांवर सूज
जर तुमचे अवयव जसे की, पाय, हातांवर सूज येत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क करा. कारण हे हृदयावर सूज आल्याचं एक कारण असू शकतं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.
ही समस्या दूर कशी कराल?
- अशा आजारी लोकांच्या संपर्कात येणं टाळा, जे एखाद्या संक्रमणाने ग्रस्त आहेत.
- नेहमीच चांगला आहार घ्या.
- रोज व्यायाम करा
- श्वासासंबंधी व्यायाम नियमित करा.