Brain Stroke Causes And Prevention: आजकालच्या धावपळीच्या जीवनात तरूण वेगाने ब्रेन स्ट्रोकचे शिकार होत आहेत. याची सगळ्यात मुख्य कारणं म्हणजे चुकीची लाइफस्टाईल, चुकीचा आहार. आधी सामान्यपणे ब्रेन स्ट्रोक 50 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना येत होता. पण आता हा आजार तरूणांमध्येही बघायला मिळतो. अनेक कारणांनी आपल्या मेंदूला रक्त पुरवणाऱ्या नसांमध्ये अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे रक्त पुढे जाऊ शकत नाही आणि यामुळेच स्ट्रोकची समस्या होते.
ब्रेन स्ट्रोकच्या कारणांची माहिती मिळवणं थोडं अवघड आहे. याचा धोका कधी, कुणाला आणि कुणाला जास्त असतो हे आपण जाणून घेऊ. काही डॉक्टरांनुसार, ब्रेन स्ट्रोक होणार असल्याची माहिती तुम्हीही घेऊ शकता. याची काही कारणं आणि लक्षणं ओळखण्याची गरज आहे.
ब्रेन स्ट्रोक कसा होतो?
1) जर तुमचा बीपी अचानक वाढतो, तेव्हा हा ब्रेन स्ट्रोकचा धोका असू शकतो.
2) जर तुम्ही स्मोकिंग आणि मद्यसेवन जास्त करत असाल तर तुम्हाला ब्रेन स्ट्रोकचा धोका जास्त राहतो.
3) जर तुम्हाला रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय असेल आणि तुम्ही मोबाइल, लॅपटॉप बघत असाल तर तुम्हाला ब्रेन स्ट्रोकचा धोका होऊ शकतो.
4) जास्त फास्ट फूड आणि जंक फूड खाणाऱ्या लोकांना तेच पदार्थांमध्ये अधिक तेल, मसाला खाणाऱ्या लोकांनाही ब्रेन स्ट्रोकचा धोका जास्त राहतो.
5) जर तुम्ही रेग्युलर जॉगिंग, योगा किंवा एक्सरसाइज करत नसाल तर तुम्हाला ब्रेन स्ट्रोकचा जास्त धोका राहतो.
6) जे रूग्ण शुगर आणि बीपी कंट्रोलमध्ये ठेवत नाहीत, त्यांनाही ब्रेन स्ट्रोकचा धोका राहतो.
कसा कराल बचाव?
ब्रेन स्ट्रोकच्या आजारात ब्लड प्रेशर, डायबिटीस सगळ्यात जास्त कॉमन आहे. फास्ट फूड आणि प्रीजर्वेटिव फूड खाणं टाळा. तसेच आपल्या लाइफस्टाईलमुळे सुधारणा करा. रात्री उशारीपर्यंत जागण्याची सवय बदला. याने तुमची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे मेंदूत काही समस्या होतात. याने हायपरटेंशन, स्ट्रेस आणि इतर आजारांचा धोका राहतो.
ज्या लोकांचा बीपी नेहमीच खाली-वर होतो, त्यांनाही स्ट्रोकचा धोका अधिक राहतो. जर तुम्हाला या आजाराचे शिकार व्हायचे नसेल तर नियमितपणे एक्सरसाइज करा, आहारात सुधारणा करा आणि 35 वयातील लोकांनी दर तीन महिन्याला नियमितपणे शारीरिक टेस्ट करा.