आपल्याला गरम झालं की घाम येतो. परंतु असेही अनेक लोक आहेत ज्यांना घाम येत नाही. जर तुमचा असा समज असेल की, घाम येणं म्हणजे एक शारीरिक समस्या आहे. तर, तसं अजिबात नाही. घाम येणं हे शरीरासाठी फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, घामासोबतच शरीरातील अशुद्ध घटक त्वचेच्या रोमछिद्रांमधून शरीराबाहेर टाकले जातात. यामुळे त्वचेला फायदा होतो. तसेच एका संशोधनातून असे समोर आले आहे की, ज्या लोकांना घाम येतो. त्या व्यक्ती घाम न येणाऱ्या व्यक्तिंच्या तुलनेत जास्त निरोगी असतात. घाम येणं ही एक महत्त्वाची जैविक क्रिया आहे. ज्यामुळे शरीराच्या इतर क्रिया सुरळीत चालण्यास मदत होते. पण ज्या व्यक्तिंना घाम येत नाही त्यांना अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
1. जर तुम्हाला घाम येत नसेल तर तुमच्या शरीराला ऊन लागण्याचा धोका अधिक संभवतो. तसेच या लोकांच्या शरीराचे तापमान कमी होत नाही. घाम आल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते.
2. घाम आल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच शरीरातील घातक घटक घामाबरोबर शरीराबाहेर टाकले जातात. त्यामुळे अनेक रोगांपासून शरीराचे रक्षण होते. पण ज्या व्यक्तींना घाम येत नाही त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते.
3. जर तुम्हाला घाम येत नसेल तर तुम्हाला त्वचेचे विकार होण्याची शक्याता असते. जसे घामाद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्याचप्रमाणे त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये अडकलेले धूळीचे कणही घामासोबत बाहेर टाकले जातात. त्यामुळे पिंम्पल्सची समस्या होत नाही.
4. घामाद्वारे आपल्या शरीरातील अतिरिक्त मीठ शरीराबाहेर टाकले जाते. ज्या लोकांना घाम येत नाही त्यांच्या शरीरात मीठ आणि कॅल्शिअमचे प्रामाण वाढते. असातच त्यांना किडनी स्टोनचा धोकाही संभवतो.
5. घाम येत नसेल तर शरीरावर झालेल्या जखमा भरून येण्यासही वेळ लागतो.