सिनेमातील हिरोंची बॉडी बघून अनेकांना त्यांच्यासारखीच बॉडी बनवण्याची इच्छा होते आणि ते त्यासाठी जिम लावतात. लवकरात लवकर बॉडीला शेप येण्यासाठी खूप हेव्ही वर्कआऊट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र योग्य पद्धतीनं जर जीम मध्ये व्यायाम केला नाही तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे काही काळजी घेतल्यास योग्य प्रकारे बॉडी बनू शकते तसंच त्याचे दुष्परिणामही शरीरावर होत नाही. तर जाणून घेऊया जीममध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात.
1) जीममध्ये गेल्यावर थेट मशीनवर व्यायामाला सुरुवात करू नका. आधी थोडं वॉर्म अप करा. स्ट्रेचिंग करा. यामुळे शरीर व्यायामासाठी तयार होईल. वॉर्म अप न करता व्यायाम सुरू केला तर पाठ आणि अंगदुखी होऊ शकते.
2) जीममधली उपकरणं आपल्या गरजेनुसार अँडजस्ट करून घ्या. या उपकरणांवर इतरांनी व्यायाम केलेला असतो. त्यामुळे आपल्या सोयीनुसार मशीनची रचना करून घ्या.
3) जीमला रिकाम्या पोटी जाऊ नका. एखादं फळ किंवा सुका मेवा खा. यामुळे अशक्तपणा येणार नाही.
4) जीममध्ये जाताय म्हणून अतिरिक्त प्रोटिन्स घेऊ नका. जास्त प्रथिनांमुळे शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो. वजनानुसार प्रथिनं खा. एक किलो वजनाला साधारण 1.50 ग्रॅम प्रथिनांची गरज असते.
5) व्यायामानंतर साधारण पंधरा मिनिटं पाणी पिऊ नका. पण त्यानंतरही पाणी प्यायलं नाही तर डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते.
6) आहारात कबरेदकांचा समावेश न केल्यास अनेक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. वजन वाढण्याच्या भीतीने अनेकजण नो कार्ब डाएट घेतात. पण असं करणं चुकीचं आहे हे लक्षात घ्या.
7) आरोग्यदायी फॅट्सचं सेवन करा. बदाम, अक्रोडसारखे पदार्थ खा. हे पदार्थ न खाल्ल्यास डिप्रेशन, रोगप्रतिकारक क्षमता कमी होण्यासारख्या समस्या निर्माण होतात.
8) जीमनंतर लगेच कॉफी पिऊ नका. व्यायामानंतर खूप घाम आल्याने शरीरातलं पाणी कमी होतं. कॉफीमुळे ही शक्यता तीव्र होऊ शकते.