सर्वसमावेशक आहार नियमित घेतल्यास आरोग्याच्या तक्रारी उद्भवत नाहीत. तसंच आहारासोबत पुरेसा व्यायामही गरजेचा असतो. शरीरातली ऊर्जा टिकवण्यासाठी घरी शिजवलेलं अन्न उपयुक्त ठरते. डॉक्टरही नेहमीच घरी शिजवलेलं अन्न खाण्याचा सल्ला देतात. खाण्याच्या चांगल्या सवयी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. कुठलाही आजार रोगप्रतिकारशक्ती अर्थात इम्युनिटीच्या कमतरतेमुळेच होतो. यासाठीच पोषक आहार उपयुक्त ठरतो.
पर्यायाने, तब्येतीच्या तक्रारींना अटकाव होतो. शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी कोणत्या भाज्या खाणं आवश्यक आहे, याबद्दल जाणून घेऊ या. सर्व प्रकारच्या भाज्या, कडधान्यं, डाळी तब्येतीसाठी उपयुक्त असतात. पण अनेकदा त्यातल्या पौष्टिक गुणधर्मांची पुरेशी माहिती नसते. पालेभाज्या, फळभाज्यांमुळे शरीराला मुबलक पोषक तत्त्वं मिळतात. दैनंदिन डाएटमध्ये या भाज्यांचा समावेश करावा.
ब्रोकोलीब्रोकोलीमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, झिंक, फायबर आणि आयर्नचं प्रमाण जास्त असतं. रोजच्या जेवणात ब्रोकोलीचा समावेश केल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. तसंच हाडही मजबूत राहतात. वजनवाढीवरदेखील नियंत्रण राहतं.
सिमला मिरची अर्थात ढोबळी मिरचीसिमला मिरची अर्थात ढोबळी मिरची रोजच्या आहारात असणं गरजेचं आहे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते. ढोबळी मिरचीत फायबर्स, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप असतं. हे घटक शरीराला निरोगी आणि मजबूत बनवतात.
पालकपालक खाणं तब्येतीसाठी उपयुक्त ठरतं. पालकमध्ये प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असतं. पालकची भाजी खाल्ल्याने शरीराची इम्युनिटी वाढते. परिणामी, आजार दूर राहण्यास मदत होते. आहारात पालकच्या भाजीचा समावेश केल्यास शरीरातली आयर्नची कमतरता भरून निघते. यासाठी पालक सूप किंवा पालकची भाजी आहारात कायम असावी.
फ्लॉवरफ्लॉवर खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे खूप आहेत. याचं कारण फ्लॉवरच्या भाजीत कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबर्सचं प्रमाण प्रचंड असतं. यामुळे फ्लॉवरची भाजी नियमितपणे खाणं उपकारक ठरतं. यासोबतच तब्येतीच्या तक्रारी दूर राहतात. तसंच शरीराची इम्युनिटी उत्तम राहते. पचनशक्तीदेखील सक्षम राहते.
विविध पालेभाज्या शरीराची इम्युनिटी वाढवतात. यामुळे जीवणू-विषाणूंचा शरीरात शिरकाव होत नाही. रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर तब्येतीच्या तक्रारी उद्भवत नाहीत. यासाठीच अनहायजिनिक ठिकाणी खाणं टाळावं. आहारात जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. तसंच प्रकृतीनुसार डाएट ठरवताना डॉक्टरांचं मार्गदर्शन जरूर घ्यावं.