किडनी आपल्या शरीराचा महत्वपूर्ण भाग आहे. पण अलिकडे अनेकांना किडनींसंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. पण आपण रोज असे काही पदार्थ खातो ज्यामुळे शरीराचं नुकसान होतं. याच पदार्थांच्या अतिसेवनामुळे किडनीलाही इजा पोहोचते आहे. चला जाणून घेऊ ते पदार्थ.....
मीठ
जास्त मीठ खाल्याने काही लोकांना ब्लड प्रेशरची समस्या होते. त्यामुळेच त्यांच्या किडनीचंही नुकसान होतं. इतकेच नाही तर जास्त मीठ खाल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यताही अधिक असते. यामुळे लघवी करताना वेदना होणे ही समस्या होऊ शकते.
धुम्रपान
नियमीत धुम्रपान केल्याने केवळ उच्च रक्तदाबाची समस्या नाही तर टाइप २ डायबिटीजही होऊ शकते. हे दोन्ही किडनीच्या समस्यांचे मुख्य कारण सांगितले जातात. याने किडनीला रक्तप्रवाह कमी होतो. ज्यांना किडनीचा त्रास आधीच आहे त्यांना ही समस्या अधिक जाणवते.
डाएट सोडा
जे लोक दररोड एक किंवा दोन डाएट सोडा पितात ते किडनीच्या आजाराच्या जाळ्यात सहज येऊ शकतात. एका अभ्यासानुसार, ज्या महिला २० वर्षांपासून नियमीत डाएट सोडा पितात त्या महिलांची किडनी ३० टक्के कमी काम करते.
डिहायड्रेशन
योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने किडनी योग्यप्रकारे कार्य करते. अशात जास्तीत जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी चांगलं असतं. जर एखाद्याच्या लघवीचा रंग पिवळा येत असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरात पाण्याचं प्रमाण कमी असल्याचं समजा. अशावेळी भरपूर पाणी पिणे फायद्याचे ठरते. तसेच जर कुणाला डिहायड्रेशनची समस्या सतत होत असेल तर याचा प्रभाव सर्वात जास्त किडनीवर पडतो. त्यामुळे किडनी निरोगी ठेवायची असेल तर भरपूर पाणी प्यावे.
पेनकिलर
वेदना कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पेनकिलरचे काही फायदे आहेत तर काही तोटेही आहेत. जास्त प्रमाणात पेनकिलर घेतल्यास महागात पडू शकतं. याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाने उपचार घ्या.
ओव्हर ट्रेनिंग
फिजिकल ट्रेनिंग घेणे चांगली गोष्ट आहे. पण प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केल्याने राब्डोमायोलॉसिस होऊ शकतो. ही एक अशी अवस्था आहे ज्यात वेगाने मसल्स टिश्यू कमजोर होऊ लागतात. याने रक्ताचे काही सब्सटेंस कमी होतात, ज्याने किडनीचं नुकसान होतं. इतकेच नाही तर किडनी फेलही होऊ शकते. त्यामुळे फिजिकल ट्रेनिंग योग्यप्रकारे करावे.
जास्त प्रोटीन
यात अजिबात दुमत नाहीये की, प्रोटीन चांगल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. पण जास्त प्रोटीनमुळे किडनी सामान्य प्रकारे काम करत नाही. जास्त प्रोटीनमुळे किडनीवर अतिरीक्त भार पडतो. त्यामुळे अंडे, मासे, बीन्स, नट्स खाण्याआधी ते किती प्रमाणात खावे याचा सल्ला तज्ज्ञांकडून घ्यावा.