शरिर स्वच्छतेसाठी आपण दररोज आंघोळ करतो. आंघोळीने त्वचेवरचा मळ, मृत पेशी निघून जातात. त्यामुळे आपण दिवसभर आपण फ्रेश असतो. पण आंघोळ करताना आपण अशा काही चुका करतो, ज्या वेळीच टाळणे गरजेचे आहे. कारण याचा परिणाम तुमच्या आरोग्यासोबतच सौंदर्यावरही होतो.
गरम पाण्याची आंघोळ
आंघोळीसाठी गरमागरम पाणी घेतले तरच मनसोक्त आंघोळ होते, अशी काहींची धारणा असते. जी अत्यंत चुकीची आहे. आंघोळीसाठी गरम पाण्याच्या वापराने त्वचा कोरडी होते. यामुळे शरीराला खाज सुटण्याची शक्यता असते. पण अंघोळीसाठी गरम पाण्याच्या वापराने त्यांच्या शरिरातील आवश्यक ऑईल नष्ट होतं.
शॉवरखाली जास्त वेळ
आंघोळ करताना शॉवरखाली जास्त वेळ घालविणे हा अनेकांसाठी आवडीचा विषय आहे. पण याचे अपाय तुम्हाला होऊ शकतात. ३० मिनिटाहून अधिक काळ तुम्ही पाण्यात असाल तर तुमच्या त्वचेचा ओलावा नष्ट होतो. तेव्हा जर तुम्ही शॉवरखाली अंघोळ करत असाल, तर जास्तीत जास्त 10 मिनिटांचाच अवधी आंघोळीसाठी वापरावा.
सुगंधी साबणाचा
प्रत्येकजण स्वत:च्या आवडीने सुगंधी साबण वापरत असतो. बाजारात अनेक सुगंधी साबण ग्राहकांना भुरळ घालत असतात. पण आंघोळीसाठी सुगंधी साबणाच्या वापरानेही त्वचा कोरडी होते. त्यामुळे आंघोळीसाठी एशेंशियल ऑईल युक्त साबण वापरल्यास त्वचेसाठी चांगले असते.
आंघोळीचा ब्रश
आंघोळीसाठी ब्रशचचा वापर करणे केव्हाही चांगलेच पण तो जुना झाल्यास बदलणे महत्त्वाचे असते. कारण, जुन्या ब्रशच्या वापरानं तुमच्या त्वचेला इजा पोहचू शकते. त्यामुळे जितके जुने बॉडी पफ किंवा ब्रश असेल, तितकाच शरिरावर किटाणू जमण्याची शक्यता जास्त असते.
ताकदीने अंग कोरडं करणे
अकनेकजण आंघोळ झाल्यानंतर टॉवेल घेऊन जोरजोरात घासून घातून अंग पुसतात. काही लोक तर विचित्र आवाजही काढतात. अशात जर टॉवेल कोरडा असेल तर त्यामुळे तुमच्या स्कीनला इजा होण्याची शक्यता जास्त असते. सुरुवातीला याचं काही वाटणार नाही, पण काही काळाने याचा त्रास तुम्हाला जाणवायला लागेल. त्यामुळे शक्य झाल्यास सॉफ्ट टॉवेल वापरा.