सध्या तरुणांमध्ये वजन कमी करण्याची क्रेझ आहे. व्यायामासाठी जिममध्ये जाणं अनेकांना अधिक सुरक्षित वाटतं. वजन नियंत्रण आणि फिट राहण्यासाठी अनेक जण लिफ्टचा वापर करण्याऐवजी पायऱ्यांनी जाणे पसंत करतात. तसे पायऱ्या चढणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुमचा लठ्ठपणा वाढत असेल तर तो कमी करण्यासाठी पायऱ्या हा एक कमी वेळात चांगला व्यायाम ठरू शकतो. शिवाय पायऱ्या चढणे हा मोफत व्यायाम आहे. यामुळे तुमच्या खिशावर अनावश्यक भार पडत नाही. पायऱ्या चढण्याचे अनेक फायदे आहेत, त्यामुळे फिटनेस तज्ज्ञ निरोगी व्यक्तीलाही पायऱ्या चढण्या-उतरण्याचा सल्ला देतात. मात्र, याबाबत अशा काही गोष्टी आहेत, ज्या जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.
वजन कमी करण्यासाठी पायऱ्यांचा वापर -HealthyFimy च्या मते, तुम्ही जितक्या जास्त वेळ पायऱ्या चढण्याच्या अॅक्टिविटी करास, तितक्या जास्त कॅलरी बर्न कराल. मात्र, पायऱ्या चढण्याचे काम तुम्ही जितक्या वेगाने कराल तितकी तुम्हाला दुखापत होण्याची शक्यताही वाढेल. त्यामुळे 5 ते 7 मिनिटे पायऱ्या चढण्याचा व्यायाम करा. तुम्ही असे आठवड्यातून 3 दिवस करू शकता. जेव्हा तुम्हाला या क्रियाकलापाची सवय होईल, तेव्हा तुम्ही हळूहळू तुमचा कालावधी वाढवू शकता आणि तुम्ही ते 7 मिनिटांऐवजी 10 किंवा 15 मिनिटे करू शकता.
वजन कमी करण्यासाठी पायऱ्या चढण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा -पायऱ्या चढण्याआधी लक्षात ठेवा की, पायऱ्या जास्त लांब नसाव्यात आणि त्या खूप मोठ्या नसाव्यात. पायऱ्यांमध्ये जास्त अंतर नसावे जेणेकरून पडण्याचा धोका नसेल. चढताना एकावेळी दोन-दोन पायऱ्या चढाव्या लागतील (एका पायरीवर दोन पाय आणून वर चढत राहणे), पण उतरताना एकाच लयीत उतरत राहावे लागते. हा व्यायाम तुम्ही दिवसातून अनेक वेळा करू शकता, यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होईल आणि पोटही बाहेर येणार नाही.
पायऱ्या चढताना दीर्घ श्वास घ्या -तुम्ही पायऱ्या चढता तेव्हा तुम्हाला श्वास लागायला लागतो, त्यामुळे पायऱ्या चढताना दीर्घ श्वास घ्या. हा देखील एक प्रकारचा व्यायाम आहे, त्यामुळे तुम्ही एका वेळी 40 ते 50 दीर्घ श्वास घेऊ शकता. यामुळे तुमच्या पोटातील अतिरिक्त चरबी कमी होईल आणि शरीराला चपळता येईल.
ट्रायसेप्स डिप व्यायाम -हा एक प्रकारचा व्यायाम आहे, त्यासाठी तुम्हाला असे करावे लागेल की जेव्हा तुम्ही पहिली पायरी चढता तेव्हा तुमचा हात जमिनीवर अशा प्रकारे संतुलित करा की संपूर्ण शरीराचा भार तुमच्या हातावर येईल. शरीराचा भार हातात ठेवताना, हळू हळू आपले शरीर वर खाली करा आणि त्याच वेळी दीर्घ श्वास घ्या. हा व्यायाम केल्याने पाठ आणि कंबर मजबूत होते, तसेच अतिरिक्त चरबीही कमी होते.