शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

ना कोणतंही लक्षण...ना कोणता त्रास; तरीही या लोकांना अचानक येऊ शकतो हार्टअटॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 9:21 PM

देशात गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकार आणि हार्टअटॅकच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून आली आहे.

नवी दिल्ली-

देशात गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकार आणि हार्टअटॅकच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून आली आहे. हृदयाशी निगडीत समस्या या आता काही कोणत्याही एका वयोगटापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या हृदविकाराच्या समस्यांना निमंत्रण देणाऱ्या ठरतात. याशिवाय एथेरोस्क्लेरोसिस देखील एक अशीच समस्या आहे की ज्यानं लोक अचानक हार्टअटॅकचे शिकार होतात. यात हृदयाच्या धमन्यांमध्ये कडकपणा येतो आणि त्यामध्ये रक्तप्रवाह कमी होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. 

डेन्मार्कमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये आढळून आलंय की एथेरोस्क्लेरोसिसचा त्रास तुम्हाला असेल तर हार्टअटॅक येण्याचा धोका आठ पटीनं अधिक असतो. 

एथेरोस्क्लेरोसिस का आहे इतकं धोकादायक?एथेरो म्हणजे फॅट आणि स्क्लेरोसिस म्हणजे जमा होणं. जर हृदयाच्या धमन्यांमध्ये फॅट किंवा कोलेस्ट्रॉल जमा झालं तर जी परिस्थिती निर्माण होते त्याला एथेरोस्क्लेरोसिस असं म्हटलं जातं. यात धमण्या ब्लॉक होतात आणि हार्टअटॅकचा धोका वाढतो. एथेरोस्क्लेरोसिस जर यकृतात झाला असेल तर त्याला लीवर फिलियर आणि किडनीत झाला तर त्याला किडनी फेलियर म्हटलं जातं. पण या आजाराची सर्वात मोठी अडचण म्हणजे याची लक्षणं लगेच कळून येत नाहीत आणि यामुळे बहुतांश रुग्णांना या आजाराबाबत माहिती मिळणं कठीण होऊन जातं. 

डेन्मार्कच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या माहितीनुसार या परिस्थितीत हळूहळू धमण्यांमध्ये फॅट जमा होण्यास सुरुवात होते ज्यामुळे रक्तप्रवाहात खूप अडचणी निर्माण होतात. 

कोणतेही संकेत न देता होता आजारबहुतांश लोकांमध्ये या रोगाची लक्षणं दिसून येत नाहीत. पण हार्टअटॅक आणि स्ट्रोकचा धोका यामुळे वाढतो. एथेरोस्क्लेरोसिसचा हा आजार कमी वयातच सुरू होतो पण त्याची लक्षणं बराच काळ लोटल्यानंतरही दिसून येत नाहीत. जोवर संबंधित व्यक्तीला हार्टअटॅक येत नाही तोवर काहीच लक्षणं जाणवत नाहीत, असं एनल्स ऑफ इंटरनल मेडिसीनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 

संशोधनात धक्कादायक माहिती उघडडेन्मार्कच्या कोपहेगनमधील संशोधकांनी ९ हजाराहून अधिक लोकांचं परिक्षण केलं होतं. ज्यात ४० हून अधिक वयोगटातील व्यक्तींचा समावेश होता. हे लोक हृदयाशी संबंधित कोणत्याही आजारानं पीडित नव्हते. संशोधनात त्यांनी कंप्युटेड टोमोग्राफी एंजियोग्राफीचा वापर केला होता. ज्यात त्यांनी लोकांच्या हृदय आणि धमण्यांचा संपूर्ण एक्स-रे केला. धक्कादायक बाब अशी की यात ४६ टक्के लोकांमध्ये सबक्लिनिकल कोरोनरी एथेरोस्क्लेरोसिसची समस्या दिसून आली होती.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका