Diabetes : भारत देश हा डायबिटीस आजाराची राजधानी मानला जातो. दिवसेंदिवस डायबिटीसचे रूग्ण वाढत आहेत. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे हा आजार मुळापासून दूर करण्यासाठी ठोस असा कोणताही उपाय नाही. हा आजार केवळ नियंत्रित ठेवला जाऊ शकतो. संतुलित आहार आणि हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करून तुम्ही डायबिटीस कंट्रोल करू शकता. तसेच एक असं कंगमूळ आहे जे डायबिटीसमध्ये खूप फायदेशीर ठरतं. या कंदमुळाला रामफळ असंही म्हणतात. अशी मान्यता आहे की, भगवान श्रीराम १४ वर्ष वनवासात होते तेव्हा ते हेच फळ खात होते. हे एक जंगली फळ आहे. हे फळ शेतांमध्ये उगवलं जात नाही.
या फळांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. यात व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, आयर्न आणि काही फायटोन्यूट्रिएंट्सही भरपूर असतात. संधिवात आणि मांसपेशींमध्ये वेदना असणाऱ्यांसाठीही हे फळ फायदेशीर ठरतं. अशात या फळाचे फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
डायबिटीसमध्ये कंदमुळाचे फायदे
हे कंदमूळ खाल्ल्याने ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. म्हणजे याच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही. कंदमुळाच्या सेवनाने शरीरात इन्सुलिन वाढतं. याने डायबिटीस कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते. हे कंदमूळ तुम्ही सलादच्या रूपात किंवा असंही खाऊ शकता.
बॅड कोलेस्ट्रॉल होईल दूर
हे खास कंदमूळ हृदयरोगाने ग्रस्त लोकांसाठीही फायदेशीर ठरतं. यात व्हिटॅमिन सी आढळतं. ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. त्यासोबतच याने ब्लड वेसल्सही हेल्दी राहतात. याने हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांना खूप फायदा मिळतो.
केसांसाठी फायदेशीर
हे कंदमूळ केसांसाठीही खूप फायदेशीर मानलं जातं. ज्या लोकांचे केस खूप जास्त गळतात किंवा कमी वयात पांढरे होतात त्यांनी या फळाचं सेवन केलं पाहिजे. यात काही खास अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे पांढरे केस काळे करण्यास मदत करतात. तसेच ज्या लोकांमध्ये आयर्नची कमतरता असते आणि केसगळती होते, त्यांच्यासाठी हे फळ फायदेशीर ठरतं.
हीमोग्लोबिन वाढतं
ज्या लोकांच्या शरीरात आयर्नची कमतरता असते. त्यांच्यात आयर्नही कमी होतं. अशात आयर्न भरपूर असलेलं कंदमूळ खाऊन शरीरातील आयर्न कमतरता दूर करता येते.