कोरोनानंतर जगाची चिंता वाढवली आहे ती मंकीपॉक्स ने. भारतात जरी मंकीपॉक्स तितका घातक दिसत नसला तरी इतर देशात मात्र या व्हायरस ने थैमान घेतले आहे. तरी या व्हायरस पासून सावधानता बाळगावी लागणार आहे. तज्ञांच्या माहितीनुसार मंकीपॉक्सच्या नवीन म्युटेशनवर कोणत्याच औषधांचा किंवा रोगप्रतिकारशक्तीचा परिणाम होत नाही इतका हा व्हायरस घातक बनत चालला आहे. जगभरात मंकीपॉक्सच्या केसेस वाढत असतानाच ही बातमी चिंता वाढवणारी आहे. कोरोनावरच लस येण्यासाठी बराच काळ गेला होता, आता मंकीपॉक्सच्या या घातक स्वरुपामुळे तज्ञही चिंतेत आहेत.
भारतीय वैज्ञानिकांच्या माहितीनुसार म्युटेशन म्हणजे मूळ व्हायरसमध्ये अनेक बदल होतात. हे बदल आणखीनच मजबूत आणि घातक होत आहेत. परिणामी यावर कोणतेही औषध फायदेशीर ठरत नाही. रोगप्रतिकारकशक्ती ही अशावेळी प्रतिसाद देत नाही. अॅंटीव्हायरस सारखे उपाय किंवा लस असूनही हा व्हायरस लोकांना संक्रमित करत आहे.
जनरल ऑफ ऑटोइम्युनिटी मध्ये आलेल्या अहवालानुसार, या म्युटेशनमध्ये जे जे बदल झाले आहेत त्यानुसारच लस आणि इतर औषधांमध्ये बदल करावा लागणार आहे. यामुळे मंकीपॉक्स संक्रमणावर आळा बसेल. युनिव्हर्सिटी ऑफ मिझौरीचे प्राध्यापक कमलेंद्र सिंह आणि त्याच्या टीम ने मंकीपॉक्सच्या म्युटेशनची ओळख करुन दिली जो वेगाने पसरत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगात ७० हजारांवर मंकीपॉक्सच्या केसेस आहेत. तर हा व्हायरस १०० हून अधिक देशात पसरला आहे. व्हायरसमुळे होणारा मृत्युदर ३६ टक्के आहे. भारतात मंकीपॉक्सची गंभीर लक्षणे अद्याप नाही. तरी या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी घातलेल्या नियमांचे पालन करावी अशी सूचना करण्यात आली आहे. जेणेकरुन परिस्थिती गंभीर होण्यापुर्वीच त्यावर आळा बसेल.