Thyroid Cancer : ऑस्कर विजेता सिनेमा 'पॅरासाइट'ने जगभरातून प्रेम मिळवलं. या सिनेमातून लोकप्रिय झालेली कोरियन अभिनेत्री पार्क सो डॅम ही पॅपिलरी थायरॉइड कॅन्सरने (Papillary Thyroid Cancer) ग्रस्त झाली आहे. ३० वर्षीय पार्कला तिच्या रेग्युलर चेकअप दरम्यान या कॅन्सरची माहिती मिळाली. आजाराची माहिती मिळताच तिने सर्जरी केली आणि आता हळूहळू ती ठीक होत आहे. अशात थायरॉइड कॅन्सरची (Thyroid Cancer Symptoms) लक्षणे काय असतात, याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊन कुणाला याचा जास्त धोका असतो आणि याची लक्षणे काय असतात.
काय आहे थायरॉइड कॅन्सर?
थायरॉइड कॅन्सर थायरॉइडच्या कोशिकांमध्ये होतो. ही एक फुलपाखरासारख्या आकाराची ग्रंथी असते, जी गळ्याच्या खाली असते. थायरॉइडमधून निघणारे हार्मोन्स हृदयाची गती, ब्लड प्रेशर, शरीराचं तापमान आणि वजनाला नियंत्रित करतात. थायरॉइड कॅन्सर अनेक प्रकारचे असतात. यातील काही हळूहळू वाढतात तर काही फारच वेगाने वाढतात. थायरॉइड कॅन्सर कशाप्रकारचा आहे हे त्या कोशिकांवर अवलंबून असतं ज्यामुळे कॅन्सर वाढतो. थायरॉइड पॅपिलरी, फॉलिक्युलर, मेडुलरी आणि एनाप्लास्टिक प्रकारचे असतात. यात सर्वात जास्त लोक पॅपिलरी थायरॉइड कॅन्सरचे शिकार होतात
लक्षणे -
थायरॉइड कॅन्सरची लक्षणे सुरूवातीला दिसत नाहीत. पण हे जसजसे वाढतात, तसतशी गळ्यात सूज आणि वेदना वाढू लागतात. गळ्यात एक गाठ तयार होते, जी जाणवते. यामुळे घसा बसतो आणि आवाज बदलू लागतो. काही गिळतानाही त्रास होऊ लागतो. गळ्यात सतत वेदना होत राहतात. पॅपिलरी थायरॉइड कॅन्सरमध्ये या सर्व लक्षणांसोबतच श्वास घेण्यासही त्रास होतो. खासकरून लेटल्यावर.
पॅपिलरी थायरॉइड कॅन्सर
पॅपिलरी थायरॉइड कॅन्सर सामान्यपणे थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये आढळणाऱ्या विशेष कोशिकांमध्ये विकसित होतो. UK च्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, थायरॉइड कॅन्सरमध्ये सर्वात सामान्य पॅपिलरी थायरॉइड कॅन्सर असतो. हा सामान्यपणे ४० पेक्षा कमी वयाच्या लोकांना जास्त होतो. खासकरून महिलांना याचा धोका जास्त असतो. चांगली बाब ही आहे की, इतर प्रकारच्या थायरॉइड कॅन्सरच्या तुलनेत याच्यावर उपचार करणं सोपं असतं. NHS नुसार, थायरॉइड कॅन्सर झाल्याचं समजल्यावर ५ वर्षापर्यंत प्रत्येकी दहापैकी ९ लोक जिवंत राहतात. यातील अनेक लोक बरे होतात आणि सामान्यपणे जीवन जगतात.
कोणत्या कारणाने होतो थायरॉइड कॅन्सर
काही आनुवांशिक स्थिती, फॅमिलिअल एडिनोमेट्स पॉलीपोसिस, गार्डनर सिंड्रोम आणि काउडेन डिजीज सारख्या आजारांमुळे, फॅमिली हिस्ट्री, रेडिएशन थेरपीसारख्या गोष्टींमुळे या कॅन्सरची शक्यता वाढते.