वाढत्या वयासोबत आरोग्याशी संबंधीत समस्याही वाढतच जातात. अशावेळी स्वत:ला फिट ठेवणे आणि आरोग्यासंबंधी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं असतं. तुम्हालाही जर स्वत:ला हेल्दी ठेवायचं असेल आणि जास्त आयुष्य जगायचं असेल तर काही टिप्स फॉलो करा.
डायबिटीज
डायबिटीज हा त्या आजारांपैकी आजार आहे जो आयुष्याला सर्वात जास्त प्रभावित करतो. या आजाराने ग्रस्त व्यक्तीला आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशात गरजेचं आहे की, हा आजार सुरुवातीच्या स्टेजमध्येच कळावा आणि वेळेवर मेडिकल टेस्ट कराव्यात. ज्या महिलांची कंबर ३१.५ इंचापेक्षा जास्त आहे आणि पुरुषांटी ३७ इंचापेक्षा अधिक आहे. त्यांना ब्लड प्रेशर, हृदयरोग आणि डायबिटीज होण्याचा धोका अधिक असतो.
हृदयरोग
अलिकडे बदलत्या लाइफस्टाइलमुळे जास्त वयातच नाही तर कमी वयाच्या तरुणांनाही हृदयरोग होताना दिसत आहेत. त्यामुळे लाइफस्टाइलच्या नादाला न लागता आरोग्याची आवश्यक ती काळजी घेतली तर हा आजार टाळला जाऊ शकतो.
हृदयासाठी या गोष्टींपासून रहा दूर
स्मोकिंगची सवय केवळ फुफ्फुसं नाही तर हृदयाचंही नुकसान करते. अशात ही सवय बंद केली तर तुमचं आयुष्य वाढू शकतं. तुमची बीएमआय टेस्ट करा आणि त्यानुसार वजन कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांनी आपल्या डाएटची विशेष काळजी घ्यावी. खासकरुन जास्त मीठ किंवा तेलकट पदार्थ खाऊ नये.
स्मरणशक्ती
(Image Credit : Daily Express)
डिमेंशिया स्मरणशक्तीशी निगडीत एक आजार आहे. या आजारात व्यक्ती लोकांना ओळखणे विसरतो. वाढत्या वयात अधिक समस्या वाढू नये म्हणून मेमरी एक्सरसाइज करणे तुमच्या फायद्याचे ठरु शकतं. उदाहरण द्यायचं तर १०० ते १ पर्यंत उलटी गिनती करा. पझल्स सॉल्व करा, बुद्धीबळ खेळा, छोट्या छोट्या कविता लक्षात ठेवा.
स्ट्रेस
आजच्या धावपळीच्या जीवनात कमी वयापासूनच अनेकांना स्ट्रेसची समस्या होतात बघायला मिळते. जास्त आणि सतत होणार स्ट्रेस हा आरोग्यासाठी चांगलं नाही. स्ट्रेसमुळे वेगवेगळे गंभीर आजार होण्याचा धोकाही असतो. यापासून बचाव करण्यासाठी तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा. योगाभ्यास करा, मित्रांना भेटा, फिरायला जा, परिवारासोबत वेळ घालवा आणि काही अडचण असेल तर मनात ठेवण्याऐवजी ती शेअर करा. याने तुम्हाला हलकं तर वाटेल आणि समस्येवर उपायही सापडेल.