(Image Credit : www.montefioredental.com)
दातांची सेंसिटीव्हीटी म्हणजेच दातांमध्ये झिणझिण्या येणे ही समस्या अनेकांना होत असते. याचा त्रास कधी कधी इतका असतो की, काही खाणं तर सोडाच पाणि पिणेही कठिण होऊन बसतं. ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगत आहोत.
१) दातांची स्वच्छता निट करा
दातांची स्वच्छता करण्यासाठी मुलायम ब्रशचा वापर करा. माऊथवॉशचा वापर करा. दिवसातून दोनदा ब्रश करा. काही खाल्यानंतर चांगल्याप्रकारे गुरळा करा.
२) डाएटची घ्या काळजी
ही समस्या असेल तर ज्यात सिट्रिक अॅसिडचं प्रमाण अधिक असतं असे ड्रिंक घेणे टाळा. खासकरुन टोमॅटो, संत्री, ज्यूस, लिंबाला रस आणि सोडा टाळा. असे थंड पेट पिऊ नका जे तुमच्या दातांची संवेदनशीलता वाढवतात. नियमित मसालेदार पदार्थ खाल्याने दातांचं नुकसान होतं. त्यामुळे तेही कमी खावे. फायबरचं प्रमाण अधिक असलेले पदार्थ खावे.
३) कॅल्शिअम असलेले पदार्थ खावे
दातांच्या समस्या दूर करण्यासाठी कॅल्शिअम गरजेचं आहे. दुधापासून तयार पदार्थांमध्ये कॅल्शिअम अधिक प्रमाणात असतं. त्यासोबतच पालेभाज्या आणि ड्राय फ्रूट्स यानेही तुम्हाला कॅल्शिअम मिळतं.
४) भरपूर पाणी प्यावे
आपण दिवसभरात कमीत कमी चार लिटर पाणी पिणे गरजेचे असते. जेवणानंतर गुरळा करणे गरजेचे असते कारण त्याने दातांमध्ये अडकलेले पदार्थ निघून जाता.
५) रूट कॅनल करा
डॉक्टर बऱ्याचदा ढिसूळ दातांना मजबूत करण्यासाठी रुट कॅन करण्याचा सल्ला देतात. रुट कॅनलने दातांमध्ये येणाऱ्या झिणझिण्या बंद होतात.