Tips For Proper Sleep : रात्री लवकर झोप येत नसले किंवा झोपल्यावर झोप मधे मधे मोडत असेल तर अर्थातच सकाळी तुम्हाला फ्रेश वाटणार नाही. रात्री लवकर झोप न येणे किंवा झोप मधे मधे उघडणे ही समस्या अनेकांना होते. याचा प्रभाव आपल्या आरोग्यावर पडतो. पण रात्री झोप पुन्हा पुन्हा का मोडते याचं कारण तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर याचं उत्तर आहे तुमचं खाणं-पिणं. रात्री तुम्ही काय खाता यावर तुमची झोप अवलंबून असते. रात्री झोपण्यापूर्वी अनेकजण चॉकलेट, कॉफी किंवा कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खातात. ज्यामुळे तुमची झोप प्रभावित होते. चला जाणून घेऊ चांगल्या झोपेसाठी काय करावं आणि काय करू नये.
झोपण्याआधी कॅफीनचं सेवन करू नये
वेगवेगळ्या रिसर्चनुसार, सर्वातआधी तर तुम्ही झोपण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव डोक्यातून काढून टाका. त्यानंतर झोपण्याच्या २ ते ३ तासांआधी कॅफीनचं सेवन करू नका. कारण कॅफीनमध्ये असे तत्व असतात ज्याने झोप येत नाही. ज्याने आपल्या मेंदू झोपण्याऐवजी सक्रिय होतो.
कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ टाळा
कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ आपल्या झोपेत अडथळा निर्माण करतात. तसे तर एका योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेटने आपल्या झोपेला काही अडचण नाही. पण जास्त प्रमाणात याचं सेवन केलं तर मेटाबॉलिज्म प्रभावित होतं. ज्यामुळे आपली झोप प्रभावित होते. यादरम्यान आपल्याला अस्वस्थता जाणवते. त्यामुळे प्रयत्न हाच करा की, झोपण्याआधी जास्त कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ जसे की, भात, पास्ता, चिप्स, केळी, सफरचंद, बटाटे किंवा काही धान्य ज्यात कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतं हे पदार्थ टाळा.
रात्री काय खाऊ नये
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जास्त प्रोटीन असलेला आहार जसे की, मांस किंवा डाळी किंवा मासे, अंडी याचही झोपण्याआधी सेवन केलं तर तुमची झोप प्रभावित होते. असं मानलं जातं की, याने तुमच्या पचन तंत्रावर दबाव पडतो आणि पचनक्रिया हळूवार होते. त्यामुळे याचंही सेवन रात्री करू नये.
रात्री चॉकलेट खाऊ नका
सामान्यपणे सर्वांनाच माहीत आहे की, रात्री चॉकलेट खाणं आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. याने तुमचे दात खराब होता आणि याने तुमच्या झोपेतही अडथळा निर्माण होतो. काही लोक चॉकलेटचं सेवन जेवणानंतर स्वीट म्हणून करतात. तर चहा आणि कॉफी सारखंच चॉकलेटमध्येही कॅफीन प्रमाण अधिक आढळतं. याने तुमचा मेंदू सक्रिय राहतो आणि त्यामुळे तुम्हाला झोप येत नाही. इतकंच नाही तर तुमची झोप मोडते. त्यामुळे रात्री चॉकलेट खाणं टाळलं पाहिजे. या टिप्स फॉलो कराल तर तुम्ही चांगली झोप घेऊ शकता.
हे पण वाचा :
हुकूमशहा किम जोंग उन जर अचानक मेला तर नॉर्थ कोरियाचं काय होणार?