अलिकडे वजन वाढण्याची समस्या सगळ्याच वयोगटातील लोकांना उद्भवते. त्यातल्या त्यात ऑफिसमध्ये सतत सात ते आठ तास बसून काम केल्यामुळे पोटाचा आणि मांड्याचा आकार वाढत जातो. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे लोकांना घरी राहण्याशिवाय पर्याय नाही. पुरेशी हालचाल नसल्यामुळे लोकांना वजन वाढण्याची समस्या सगळ्यात जास्त उद्भवत आहे. जरी वजन नियंत्रणात असेल तरी हातांचे, मांड्याचे आणि पोटाचे मास वाढत जाऊन आकार बेढब दिसायला लागतो. लॉकडाऊन संपल्यानंतर लोकांना कपडे घट्ट होण्याची सुद्धा होऊ शकतात.
घरच्याघरी व्यायाम करून सुद्धा अनेकांचं वजन कमी होत नाही. कारण व्यायाम करण्यासोबतच तुम्ही काही चुका सुद्धा करत असता. अनेकदा वजन कमी होऊनसुद्धा शरीराच्या काही भागांवर परिणाम होत नाही. आज आम्ही तुम्हाला वजन कमी न होण्यासाठी कोणत्या चुका कारणीभूत असतात. याबाबत सांगणार आहोत.
जास्तवेळ बसून किंवा झोपून राहणं
पोटाच्या खालच्या भागात जमा झालेली चरबी व्यायाम करून सुद्धा कमी होत नसेल तर त्याचं सगळ्याच मोठं कारण तुमची जीवनशैली आहे. जर तुम्ही रोज जास्तवेळ एकाच जागी बसून राहात असाल किंवा डेस्कचा जॉब असेल तर अशी समस्या उद्भवू शकते. त्यासाठी प्रत्येक एक तासानंतर उठून ५ मिनिटांपर्यंत स्ट्रेचिंग करा.
व्यायामाची अयोग्य पध्दत
तुम्हाला तर मागच्या भागाचं वजन कमी करायचं असेल तर योग्य व्यायाम करण्याची गरज आहे. अन्यथा मेहनत करूनसुद्धा शरीरावर जमा झालेली चरबी कमी होणार नाही. त्यासाठी जंप स्क्वॅट्स, बॉक्स जंप्स या व्यतिरिक्त दोरी उड्या, शिड्या चढणं, उतरणं ही खूपचं चांगली एक्सरसाईज आहे.
तुमचा आहार संतुलित आहे का?
जर तुम्ही वजन कमी करायचं ठरवलं असेलतर डाएटमध्ये सामान्य आहारपेक्षा बदल करा. माहिती नसल्यामुळे अनेकदा लोक चुकिचा आहार घेतात. त्यासाठी आहारात कच्ची फळं, हिरव्या भाज्या, अन्न, दही, शेंगदाणे, पनीर, अंडी याचा समावेश करा. तेलकट आणि गोड पदार्थ आहारातून वगळा.
झोप
वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायाम आणि डायटिंग करणं नाही तर झोप सुद्धा गरजेची आहे. जर तुम्ही ६ तासांपेक्षा कमी झोपत असाल तर वजन कमी करणं कठीण आहे. वजन कमी करण्यासाठी जवळपास ७ ते ९ तास झोप घेणं गरजेचं आहे. यामुळे मॅटाबॉलिजम प्रभावित होऊन फॅट्स बर्न होण्यास मदत होते. ( हे पण वाचा- खाण्यापिण्याच्या 'या' चुका लिव्हर सिरोसिसला ठरतात कारणीभूत, जाणून घ्या लक्षणं)
गरजेपेक्षा जास्त व्यायाम
फिट होण्यासाठी लोक अनेकदा गरजेपेक्षा जास्त व्यायाम करतात. कारण जास्त व्यायाम केल्याने जास्त फॅट्स बर्न होतील असं त्यांना वाटत असतं. पण जास्तवेळ व्यायाम केल्याने शरीराचं नुकसान होत असतं. त्यापेक्षा कमीवेळ व्यायाम करून योग्य इंटेसिटीने करा. ( हे पण वाचा-कोरोनाला रोखण्यासाठी औषधांपेक्षा, स्वयंपाकघरातील 'हे' मसाले ठरतील फायदेशीर)