कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. अशात कोरोनाच्या प्रसाराबाबत आणि बचावाबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जे लोक सुरूवातीपासून कोणत्याही आजारांचे शिकार आहेत अशा लोकांना कोरोनाच्या संक्रमणाचा धोका जास्त असतो.
कोरोनाच्या संक्रमणामुळे मृत्यू होत असलेल्या लोकांमध्ये ७० टक्के लोक वयस्कर आहेत. तसंच कॅन्सर, हृदय विकार , रक्तदाबाच्या समस्यांनी पीडीत आहे. जर तुमच्या घरात सुद्धा वयस्कर व्यक्ती असून एखाद्या आजाराने ग्रस्त असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ज्यामुळे तुम्हाला कोरोना व्हायरसपासून लांब राहता येईल.
आपली औषधं न चुकता घ्या
कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे तुम्हाला दवाखान्यात जाण्यासाठी उशीर होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही आधीपासून डायबिटीस किंवा हृदयांसंबंधी काही आजार असेल तर आपल्या गोळ्या, औषधं नियमितपणे घ्या. कंटाळा करू नका. डॉक्टरांच्या संपर्कात राहा. फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही त्रास होत असेल तर डॉक्टरांना विचारून मगच औषधं आणि गोळ्या घ्या.
गरज असेल तरच घराबाहेर पडा
तुम्ही कोणत्याही गंभीर समस्येचे शिकार असाल तर घराबाहेर न पडणंच उत्तम ठरेल. कारण आजारांचा सामना करत करत सतत औषधं गोळ्या घेऊन रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते. अशा स्थितीत घराबाहेर पडल्यास संक्रमणाचा सगळ्यात जास्त धोका असू शकतो.
व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी या टिप्स वापरा
घरातील व्यक्तीपासून २ मीटर अंतर ठेवा.
आपल्या गोळ्या औषध आणि गरजेचे साहित्य मागवण्यासाठी घरातील एखाद्या तरूण व्यक्तीला पाठवा.
सतत स्वतःचे हात धुत राहा आणि साबण किंवा एल्कोहोल सॅनिटायजरचा वापर करा.
तुम्ही स्वतःच्या तोंडाला, नाकाला आणि डोळयांना जितका कमी स्पर्श कराल तितकं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.( हे पण वाचा-CoronaVirus News : शारीरिक संबंधांमुळे कोरोना होण्याची भीती; स्पर्म्समध्ये सापडला विषाणू)
रेड झोन किंवा कंटेनमेंट झोनमध्ये राहत असाल तर कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडू नका. ऑनलाईन सामानाची खरेदी करा. (हे पण वाचा-औषध की लस, कोणता आहे कोरोनाचा प्रभावी उपाय; माहीत करून घ्या दोघांमधील फरक)