शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

गरज तंबाखूविरोधी जनजागृतीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:59 AM

वाढत्या धूम्रपानामुळे पुरुषांच्या प्रजनन हार्मोन्सवर परिणाम होतो, हे संशोधनाने सिद्ध केले आहे. म्हणजे शुक्राणंूची निर्मिती घटते

दाजी कोळेकरतंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगाचा जास्त धोका असतो. पेशीतल्या जनुकाला धक्का लागल्यामुळे जेव्हा पेशीची अनिर्बंध वाढ होऊ लागते त्याला कर्करोग म्हणतात. तंबाखू व सिगारेटमुळे १६ प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता असते. फुप्फुसाच्या दर दहा कॅन्सर रुग्णातील नऊ धूम्रपानाशी निगडित आहेत. हा लपून वाढत असतो अणि शेवटच्या टप्प्यावर यातना सुरू होतात.आपल्याकडे एखादी गोष्ट करू नये, असे सांगितले की ती जाणीवपूर्वक केली जाते. मग त्यात धोका वा नुकसान असले तरी सुद्धा. ही बाब तंबाखूच्या बाबत घडताना दिसत आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनातून असणारा धोका उत्पादकांकडून सांगितला जातो. तरीसुद्धा सुटत नाही. त्यामुळे आपण एखाद्या व्यसनाच्या किती आहारी जातो, हे यावरून स्पष्ट होते. आज ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन, यानिमित्त शरीर पोखरणाऱ्या तंबाखूबाबत थोडेसे.तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे फुप्फुसाचा व तोंडाचा कर्करोग उद्भवण्याची शक्यता असते. त्यातील निकोटीन हा घातक पदार्थ शरीरावर दुष्परिणाम करतो. म्हणजे सर्दी खोकल्यापासून ते न्यूमोनिया, कर्करोगापर्यंत विविध रोगांना तंबाखू निमंत्रण देते. तसेच शरीरातील १० अवयवांवरही दुष्परिणाम करते.तंबाखू भारतात एक नगदी पीक असणारी वनस्पती आहे. हा एक नशादायक पदार्थ असून याचा वापर लोक खाण्यासाठी करतात. तसेच यापासून तयार केलेले विडी, सिगारेट, सिगार, हुक्का, गुटखा, तपकीर व मशेरी या तंबाखूजन्य पदार्थांचाही चुन्याबरोबर, पानात घालून विविध स्वरूपात सेवन केले जाते. तंबाखू, तमाकू आणि टोबॅको या नावाचे मूळ अरेबियन बेटावर मिळत असून तेथील स्थानिक लोक विस्तवावर तंबाखू टाकून नळीने नाकाद्वारे धूर ओढत असत. या नळीला टाबाको म्हणत असत. त्यावरून तंबाखूची नावे प्रचलित झाली असल्याचे समजते.तंबाखूतील निकोटीन हा वेगाने रक्तप्रवाहात मिसळणारा घातक पदार्थ असून त्यामुळे तंबाखू शरीराला धोकादायक ठरते. तंबाखूच्या झाडातील ६४ टक्के निकोटीन पानांमध्ये असते. तेच पान विविध प्रकारे सेवन केले जाते. धूर वा तपकिरीमधून निकोटीन रक्ताद्वारे अगदी १०-२० सेकंदात शरीरभर पसरते. त्यातूनच शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची तात्पुरती व फसवी भावना निर्माण होते.त्वचा :धूम्रपानामुळे मानवी त्वचेचे विकार जडतात. तसेच सुरकुत्याही पडतात. परिणामी वयाआधी वृद्धत्व येण्याची शक्यता.गर्भधारणा :धूम्रपानामुळे गर्भधारणेमध्ये अडथळे येण्याचा धोका असतो. फेलिपाईन ट्युबला झालेली गर्भधारणा गर्भाशयामध्ये पाठवणे कठीण जाते.गर्भाशय :निकोटीनमुळे गर्भाशय, मासिक पाळी या विपरीत होत असतो. तसेच तंबाखू सेवनामुळे रक्तवाहिन्या व गर्भाशयाला होणा-या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होतो.गर्भाशयाचे मुख:ह्युमन पालीलोमा व्हायरसमुळे कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे महिलांनी धूम्रपानापासून दूर राहणे गरजेचे आहे.अन्ननलिका :धुरामुळे अन्ननलिकेचा खालील भाग शिथिल बनतो ज्यामुळे तिथले स्रायू आकुंचन पावल्याने स्टमक अ‍ॅसिड प्रवेश करू शकत नाही. जेव्हा स्रायू सैल होतात तेव्हा अ‍ॅसिड वरच्या दिशेने ओढले जाते. त्यामुळे अन्ननलिकेचे नुकसान होते. त्यातून कर्करोगाची शक्यता असते. पेनिस :धूम्रपान केल्यामुळे पुरुषांमध्ये इरेक्शनसाठी पेनिसमध्ये होणाºया रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होतो. परिणामी सेक्स लाइफ धोक्यात येण्याची भीती असते.अंडकोष :वाढत्या धूम्रपानामुळे पुरुषांच्या प्रजनन हार्मोन्सवर परिणाम होतो, हे संशोधनाने सिद्ध केले आहे. म्हणजे शुक्राणंूची निर्मिती घटते.किडनी :धूम्रपानामुळे मुत्रामध्ये अ‍ॅल्युमिनिअमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे किडनीला रक्तपुरवठा करणाºया वाहिन्या अरुंद होतात आणि किडनीचे कार्य कमी होते.डोळे :विषारी घटकामुळे डोळ्यावर ताण पडतो. तसेच धुरामुळे डोळ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.हृदय :निकोटीन सेवनामुळे धमन्या आकुंचन पावता व रक्तपुरवठा कमी होतो. तसेच कार्डिओ व्हॅस्क्युलरवर परिणाम होतो.