शहरं
Join us  
Trending Stories
1
BRS ला मोठा झटका! ६ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधान परिषदेचं संख्याबळ वाढणार
2
मोठी बातमी: पंचवटी एक्स्प्रेसला कसाऱ्यात अपघात; दोन डबे झाले वेगळे
3
"गैरसमजातून घोटाळ्याची तक्रार"; वायकरांना क्लीन चीट मिळाल्यानंतर काँग्रेस म्हणतं, "उमेदवार झाले तेव्हाच..."
4
आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहोत, नंतर...; मनोज जरांगे नक्की काय म्हणाले?
5
दर महिन्याला EMI भरावा लागत नाही असं लोन माहितीये का? इमर्जन्सीमध्ये येऊ शकतं कामी
6
"BMCने गैरसमजातून तक्रार केली होती"; शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट
7
अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीत रणवीर थिरकला 'इश्क दी गली' गाण्यावर, तर सलमानचाही डान्स व्हायरल
8
शिक्षण, आरोग्याचा दर्जा वाढवण्यासाठी सांगलीचा जयंत पॅटर्न राज्यात राबवणार; अजित पवारांची विधानसभेत घोषणा
9
केंद्रातील सरकार ऑगस्टपर्यंत कोसळेल, तयारीला लागा; INDIA आघाडीतील मोठ्या नेत्याचा दावा
10
"भरपाई आणि विम्यात फरक असतो"; हुतात्मा अग्निवीरांना मदत मिळाली नसल्याचा राहुल गांधींचा पुन्हा आरोप
11
गॅरेजमधून झालेली सुरुवात, आज आहे जगातील सर्वात मोठी रिटेलर; पाहा Amazon च्या यशाची कहाणी
12
प्रेग्नेंसीच्या चर्चेवर अखेर सोनाक्षी सिन्हानं सोडलं मौन, म्हणाली - "आता हॉस्पिटलला..."
13
...आता पेपर फोडला तर होईल एक कोटींचा दंड अन् १० वर्ष कैद; विधानसभेत विधेयक सादर
14
"काही दिवसांपूर्वी स्वामींच्या तारकात झळकण्याची संधी मिळाली तेव्हाच..."; भाग्यश्री मोटेचा अनुभव
15
Rohit Sharmaचं घर आहे जगातील ५० हायराईज टॉवरपैकी एकात; किती आहे किंमत, काय आहेत वैशिष्ट्ये
16
Hathras Stampede : १२१ भाविकांच्या मृत्यूवर पहिल्यांदा बोलले भोले बाबा; म्हणाले, "त्या घटनेनंतर मी..."
17
"माझा बालमित्र लक्षाची खूप आठवण आली...", निवेदिता सराफ यांनी अभिनय बेर्डेचं केलं कौतुक, पोस्ट चर्चेत
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चंचल मनःस्थितीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल!
19
डोंगरामध्ये अडकलेल्या ५ अल्पवयीन मुलांची तब्बल सात तासांनी सुखरूप सुटका
20
श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षात ठेवा; शेरोशायरी ऐकवत अजित पवारांचे विरोधकांना चिमटे

जास्त मीठ खाल्ल्याने होते 'ही' गंभीर समस्या, तुम्ही कधी याबाबत विचारही केला नसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 12:35 PM

मिठाशिवाय पदार्थाला चवच नाही. मात्र अनेकांना वरुन मीठ घेण्याची सवय असते जी अत्यंत चुकीची सवय आहे. याचा अर्थ तुम्हाला अतिप्रमाणात मीठ खावे वाटते.

कोणत्याही पदार्थात मीठ असणे आवश्यक आहे. मिठाशिवाय त्या पदार्थाला चवच नाही. मात्र अनेकांना वरुन मीठ घेण्याची सवय असते जी अत्यंत चुकीची सवय आहे. याचा अर्थ तुम्हाला अतिप्रमाणात मीठ खावे वाटते. अन्नात कधी  मीठ कमी जरी पडले तरी शक्यतो ते तसेच खावे. पदार्थ तयार झाल्यावर तो ताटात वाढल्यावर वरुन मीठ घेऊ नये. यामुळे हृदय, मुत्रपिंडाचे विकार होतात हे आपण ऐकलंच असेल. पण याचा मानसिक परिणामही होतो. एका संशोधनातुन हे सिद्ध झाले आहे.

संशोधनात काय म्हणले आहे ?

एडिनबर्गच्या युनिव्हर्सिटी ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्स सेंटरमधील रेनल फिजिओलॉजीचे प्राध्यापक मॅथ्यू बेली यांनी केलेल्या रिसर्चनुसार अन्नातील मिठामुळे मानसिक आरोग्य बदलते. जास्त मीठ खाल्ल्याने मेंदुचा ताण वाढतो. यामुळे हार्मोन्समध्येही मोठे बदल होतात. यामुळे तणाव येऊ शकतो. तो तणाव कसा हाताळायचा हे व्यक्तीव्यक्तीवर अवलंबुन आहे. म्हणुनच काही जणांना खूप खारट सहन होत नाही. उच्च रक्तदाबाचा त्रासही होतो.

कार्डिओव्हॅस्क्युलर संशोधकांनी उंदरांवर प्रयोग करुन बघितला. जास्त मीठ सेवन केल्याने स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते. कमी मीठ सेवन केलेल्या उंदरांपेक्षा जास्त मीठ खाल्लेल्या उंदरांमध्ये स्ट्रेस हार्मोन पातळी ७५ टक्क्यांनी वाढली. 

मानसिक आणि शारीरीक त्रास

जास्त मीठ खाल्ल्याने रक्तवाहिन्या, हृदय, आणि मुत्रपिंडावर परिणाम होतो. याचे वाईट परिणाम होतात. त्यामुळे मीठ खाण्यावर नियंत्रण ठेवावे. तसेच स्ट्रेस हार्मोनच्या पातळीत वाढ झाली तर आपल्या वागण्यात फरक जाणवतो. नेमके व्यक्तीच्या स्वभावात काय फरक पडतो याचा अभ्यास अजुन सुरु आहे. ज्यांना बीपी, डायबिटिस आहे त्यांना कमी मीठ खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो.  मीठ सोडियम क्लोराईडने बनले आहे ज्याचे अतिसेवन शरीरावर घातक परिणाम करतात.

टॅग्स :Healthy Diet Planआहार योजनाfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटकाMental Health Tipsमानसिक आरोग्य