सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभर एनर्जेटिक ठेवण्यासाठी फार मदत करतो. कारण रात्री जेवल्यानंतर जवळपास 8 ते 10 तास काहीही न खाता सकाळी नाश्ता करणं अत्यंत आवश्यक असतं. जर तुम्ही विचार करत असाल की, सकाळी नाश्ता न केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. तर तुम्ही अगदी चुकीचा विचार करत आहात. सकाळी पोटभर नाश्ता करण्यासोबतच शरीराला ऊर्जा देणाऱ्या तसेच बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटेल अशा पदार्थांचं सेवन करणं गरजेचं असतं. तसेच नाश्त्यामध्ये अशाच पदार्थांचा समावेश करा, ज्यांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असेल. यासाठी तुम्हाला मॉर्निंग बनाना डाएट मदत करेल.
फार कमी वेळात वजन कमी करायचं असेल तर जपानी डाएट प्लान नक्की ट्राय करा. ज्यामध्ये तुम्हाला सकाळच्या नाश्त्यामध्ये केळ्याचा समावेश करण्याचा सल्ला देण्यात येतो. जपानमध्ये हा डाएट प्लान अनेक लोक फॉलो करताना दिसतात. मॉर्निंग बनाना डाएट एक सिम्पल प्लान आहे. ज्यामध्ये केळ्यातील पोषक तत्वांचा वापर फार कमी वेळात वजन कमी करण्यासाठी केला जातो.
नाश्त्यामध्ये करा केळ्याचा सामवेश
डाएट प्लाननुसार, एखादी व्यक्ती फक्त नाश्त्यामध्ये केळी खाऊ शकते. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये किंवा स्नॅक्स टाइममध्ये इतर काहीही खाऊ शकते. यादरम्यान, लाइफस्टाइलमध्ये काही बदल करण्यासाठी सांगितले जातात. त्याचबरोबर डाएट फॉलो करणाऱ्या व्यक्ती रात्री 8 नंतर काहीही खाऊ शकत नाहीत. तसेच पेय पदार्थांमध्ये पक्त पाण्याचंचं सेवन करावं इतर पदार्थांचा समावेश करू नये.
एक्सरसाइजची गरज नाही
मॉर्निंग बनाना डाएट प्लानमध्ये हेव्ही एक्सरसाइज करण्याची अजिबात गरज नाही. जर तुम्ही हलके-फुलके व्यायामाचे प्रकार करत असाल तर तुम्हाला रिझल्ट लगेच दिसून येतील.
केळी खाण्याचे फायदे
केळ्यामध्ये असणारी पोषक तत्व आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचं काम करतं. तसेच सकाळच्या वेळी केळी खाल्याने मेटाबॉलिज्म रिचार्ज होतं. पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे तुम्ही ओवरइटिंगपासून दूर राहता. केळ्यामध्ये पोटॅशिअम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतं. जे शरीरातील फॅट्स रेग्युलेट करण्यासाठी मदत करतं. तसेच, टॉक्सिन्स शरीरातून बाहेर टाकण्यासाठी मदत करतं. यामुळे शरीराला आवश्यक असणारी उर्जाही मिळते.
या गोष्टी लक्षात ठेवा
दरम्यान, केळ्यामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे बरेच दिवस याचं सेवन करणं हेल्दी नसतं. हे एक फॅड डाएट आहे. यामुळे पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत होते. वजन कमी करण्याव्यतिरिक्त आरोग्य चांगलं राखण्यासाठी डाएट करण्यासोबतच एक्सरसाइज करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते, त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)