Herbs to get relief from headache: डोकेदुखीची समस्या फारच कॉमन आहे आणि आजकाल लोक ज्याप्रकारची लाइफस्टाईल जगतात त्यांना ही समस्या सतत होते असते. किंवा डोकं जड वाटण्याची समस्या होऊ लागते. कधी कधी तर डोकेदुखीमुळे कान, नाक, डोळेही दुखू लागतात. डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. जसे की, झोप कमी होणे, ताप, पचनक्रिया व्यवस्थित न होणे इत्यादी. पावसाळ्यात सर्दी-खोकला होत असल्यानेही डोकेदुखीची समस्या होते. अशात काही घरगुती उपयांनी तुम्ही ही समस्या दूर करू शकता.
आलं आणि हळद
व्हायरल इन्फेक्शनच्या लक्षणांपासून सुटका मिळवण्यासाठी आल्याचं सेवन केलं जातं. सर्दी-खोकला, ताप आणि डोकेदुखीवर आलं किंवा सुंठाचं पावडर, थोडे काळे मिरे आणि हळदीचा काढा किंवा चहा तयार करा. याच्या सेवनाने तुमची डोकेदुखी काही मिनिटांमध्ये दूर होऊ शकते.
काळे मनुके
डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी काळ्या मनुक्यांचं सेवन करा. यासाठी गरम ताव्यावर मनुक्यांचे 4 ते 5 दाने भाजून घ्या आणि रोज सकाळी खा. याने तुमची डोकेदुखीची समस्या लगेच दूर होईल.
तुळशीची पाने
वातावरणानुसार होणाऱ्या आजारांवर एक साधा आणि सोपा उपाय आहे तुळशीची पानं. तुळशीच्या पानांमध्ये अॅंटी व्हायरल आणि अॅंटी बायोटिक गुण असतात. जेव्हा तुळशीच्या पानांच सेवन केलं जातं तेव्हा ताप, डोकेदुखी, सर्दी-खोकला यांसारख्या समस्या लगेच दूर होतात. यासाठी तुळशीही काही पाने पाण्यात उकडून घ्या, त्यात दोन लवंग टाका. हे पाणी थोडं आटलं की, गाळून घ्या आणि काढ्यासारखं सेवन करा.
मध आणि आलं
एक चमचा मध घ्या आणि त्यात आल्याचा काही थेंब रस टाका. हे चांगलं मिक्स करा आणि खा. याने सर्दी-खोकला, डोकेदुखीसारख्या समस्या दूर होतील.