भारतात टीबी म्हणजेच ट्यूबरक्लोसिसचे सर्वात जास्त रुग्ण बघायला मिळतात. २०१६ मध्ये WHO ने २. ७९ मिलियन लोकांमध्ये हा आजार आढळला होता. टीबी एक बॅक्टेरिअल इन्फेक्शन असून याने फुप्फुसं प्रभावित होतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणं जीवघेणं ठरू शकतं.
अनेकांना असं वाटतं की, टीबी केवळ फुप्फुसं आणि हाडांमध्येच होतो. पण ही धारणा चुकीची आहे. टीबी आपल्या मेंदूलाही प्रभावित करतो. म्हणजेच मेंदूलाही टीबी होऊ शकतो. याने मेंदूतील ऊतींवर सूज येते. ऊती हे पेशी पासून तयार झालेल्या संस्था असतात. या स्थितीला मेनिनजायटिस ट्यूबरक्लोसिस, मेनिनजायटीस किंवा ब्रेन टीबी म्हटलं जातं. हा टीबी लहानांसोबतच मोठ्यांनाही होऊ शकतो. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, भारतात टीबीच्या प्रत्येक ७० केसेसमधील २० ब्रेन टीबीचे रुग्ण असतात. चला जाणून घेऊ ब्रेन टीबीची लक्षणे आणि कारणे...
ब्रेन टीबीची कारणे
जास्त प्रमाणात अल्कोहोलचं सेवन केल्याने, एचआयव्ही एड्स, कमजोर रोगप्रतिकारक शक्ती आणि डायबिटीज मेलिटस ब्रेन टीबीसाठी मुख्य कारणं ठरतात.
याची लक्षणे
ब्रेन टीबीची लक्षणे शरीरात हळूहळू बघायला मिळतात. सुरुवातीला थकवा, कमी ताप, सतत आजारी पडणे, मळमळ होणे, उलटी, चिडचिडपणा आणि आळस यांसारख्या समस्या होतात. नंतर ही लक्षणे आणखी गंभीर होत जातात. अशात वेळीच उपचार घेणे गरजेचे असते.
योग्य डाएटने उपचार
योग्य डाएटने ब्रेन टीबीपासून बचाव केला जाऊ शकतो. हा आजार रोखण्यासाठी डाएट महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे रूग्णाने त्यांच्या डाएटमध्ये ताजी फळं, भाज्या आणि भरपूर प्रमाणात प्रोटीन इत्यादी पोषक तत्त्वांचा समावेश करावा. याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि आजारांशी लढण्यास मदत मिळते.
डाएटमध्ये या गोष्टींचा करा समावेश
ताजी फळं जसे की, द्राक्ष, सफरचंग, संत्री, कलिंगड आणि अननस यांचा आहारात समावेश करा. दुधात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतात. अशात दुधाचं सेवनही फायदेशीर ठरतं. चहा किंवा कॉफीचं सेवन टाळावे तसेच डबाबंद पदार्थही खाणे टाळावे.
(टिप - या लेखात सुचवण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत. याकडे तुम्ही प्रोफेशनल सल्ला या रूपाने बघू शकत नाहीत. डाएटमध्ये कोणत्याही प्रकारचं बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)