(Image Credit : www.destinyconnect.com)
शरीरात एकूण फॅटचं प्रमाण यापेक्षाही महत्त्वाचं असतं फॅटचं शरीरात योग्य डिस्ट्रिब्यूशन. म्हणजे संपूर्ण शरीरात फॅट म्हणजेच चरबी जास्त असणे घातक नाही तर ती केवळ पोटाच्या आजूबाजूला जमा होणे जास्त घातक आहे. पुरूषांसाठी ४० इंचापेक्षा जास्त आणि महिलांसाठी ३५ इंचापेक्षा जास्त कंबरेची साइज असेल तर जाडेपणाशी संबंधित आजारांचा त्यांना सामना करावा लागतो.
पॉट बेली ओबेसिटी(जाडेपणा)
हा पोटाचा जाडेपणा आहे याला सेंट्रल ओबेसिटीही म्हणतात. यात पोटाच्या आजूबाजूला एक्स्ट्रा फॅट जमा होतं. हीच पोटावर जमा झालेली चरबी वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देण्यासारखं आहे. टाइप- २ डायबिटीज, हाय बीपी, झोपताना श्वास घेण्याची अडचण, स्लीप एप्निया, हृदयरोग, चेहऱ्यावर एक्स्ट्रा केस आणि इनफर्टिलिटीची समस्या, काही प्रकारचे कॅन्सर या समस्या होऊ शकतात.
ही सामान्य बाब
पोटाचा जाडेपणा हा महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये जास्त बघायला मिळतो. कारण महिलांचे सेक्स हार्मोन्स पोटाच्या कॅविटीमध्ये फॅट जमा होऊ देत नाहीत. पण मोनोपॉजनंतर महिलांमध्येही पोटाच्या जाडेपणाचा धोका पुरूषांइतकाच होतो. हेच कारण आहे की, नेहमी ४० ते ४५ वयापर्यंत एकदम स्लीम दिसणाऱ्या महिला अचानक ५० वयापर्यंत पोहचताना पोट आणि हिपच्या जाडेपणाच्या शिकार होतात. लाइफस्टाइल आणि जेंडर सोबतच काही चुकांमुळे जाडेपणा येतो.
फॅट जमा झाल्यावर काय कराल उपाय?
उभारदार पोट - पोट वरून खालपर्यंत फुगलेलं असतं. हे न पचणारे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने होतं. म्हणजे असे पदार्थ ज्यात व्हिटॅमिन आणि मिनरल्सचं प्रमाण फार कमी असतं.
काय करावं - अशावेळी हलकी एक्सरसाइज आणि बॅलन्स डाएटने पोट सहजपणे कमी केलं जाऊ शकतं. सोबतच काही पेय घ्या ज्याने पचनक्रिया चांगली होईल. म्हणजे तुम्ही ताक, लिंबू पाणी सेवन करू शकता. याने तुमच्या पोटाचा घेर कमी होऊ शकतो.
टायर बेली फॅट - याप्रकारच्या जाडेपणात साइडने टायरच्या आकारात बाहेर येतं. पोटाचा हा जाडेपणा तासंतास एकाच ठिकाणी बसून काम केल्याने आणि शारीरिक हालचाल होत नसल्याने होतो. अशा लोकांमध्ये गोड पदार्थ खाल्ल्याने समस्या अधिक वाढू शकते.
काय करावे - जर तुमचा जाडेपणा या कॅटेगरीमध्ये येत असेल तर सर्वातआधी अल्कोहोल आणि सोडा असलेले कोल्ड ड्रिक्स लगेच बंद करा. तसेच या समस्येपासून सुटका करून घ्यायची असेल तर हेल्दी डाएट करा आणि शारीरिक हालचालही करा. रोज साधारण १ तास ब्रिस्क वॉक करा.
लो बेली फॅट - पोट वरच्याऐवजी खालच्या बाजूने जास्त बाहेर आलेलं असतं. पोटाच्या खालच्या भागाचा जाडेपणा नेहमी एका जागेवर बसून कमा करण्याच्या सवयीमुळे आणि एकप्रकारचाच आहार सतत घेत असल्याने होतो. याप्रकारच्या जाडेपणाने पीडित लोक शरीराच्या इतर भागात स्लीम दिसतात. पण पोटाच्या खालच्या भागात फॅट जमा झाल्याने जाड दिसायला लागतात.
काय करावं - या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुमच्या दिनक्रमात एक्सरसाइजचा सहभाग करा. आहारात नेहमी वेगळेपणा ठेवा, संतुलित आहार घ्या आणि डाळिंब, गाजर, मोसंबी या फळांचं ज्यूस सेवन करा. याने पोट कमी होण्यास मदत मिळेल.
स्ट्रेस बेली - जाडेपणाच्या स्थितीमध्ये पोट खालच्या बाजूने लटकलेलं गोल दिसतं. ज्या लोकांना पचनक्रियेसंबंधी समस्या असतात त्यांना ही समस्या होते. त्यामुळे त्यांचं पोट फुगलेलं असतं.
काय करावं - या लोकांनी वेळेवर जेवण करावं, जंक फूड आणि जास्त कॅफीन म्हणजेच चहा, कॉफी, चॉकलेट ड्रिक्सचं जास्त सेवन करू नये.