सध्या अनेक लोकं दिवसभर धावपळीमध्ये असतात. यादरम्यान ते स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत. सतत बैठं काम केल्यामुळे शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यापैकीच एक समस्या म्हणजे, वाढणारं पोट. हेच वाढलेलं पोट कमी करण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. तासन्तास जिममध्ये व्यायाम करून घाम गाळण्यात येतो, तर काही अंतरापर्यंत जॉगिंग केलं जातं. परंतु काही लोकांसाठी जिममध्ये एक्सरसाइज करणं डोकेदुखी ठरतं. कारण जिममध्ये जाण्यास सुरुवात केल्यानंतर काही दिवसांपर्यंत शरीराच्या स्नायूंना प्रचंड वेदना होतात. आज जाणून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने जिमच्या वर्कआउटच्या मदतीने अगदी कमी वेळात कसे फिट व्हाल....
शरीरात एकूण फॅटचं प्रमाण किती आहे? यापेक्षाही महत्त्वाचं असतं फॅटचं शरीरात योग्य डिस्ट्रिब्यूशन. म्हणजे संपूर्ण शरीरात फॅट म्हणजेच चरबी जास्त असणे घातक नाही तर ती केवळ पोटाच्या आजूबाजूला जमा होणे जास्त घातक आहे. पुरूषांसाठी 40 इंचापेक्षा जास्त आणि महिलांसाठी 35 इंचापेक्षा जास्त कंबरेची साइज असेल तर त्यांना लठ्ठपणाशी संबंधित आजारांचा सामना करावा लागतो. ऑफिसमध्ये सतत बैठं काम केल्यामुळे अनेकदा शरीरामध्ये फॅठ जमा होतं. परिणामी पोटाचा घेर वाढू लागतो.
जर तुम्ही तुमचं दररोजचं काम आणि ऑफिस सांभाळूनही जिमसाठी वेळ काढू शकत नाही तर अजिबात घाबरण्याची गरज नाही. काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका संशोधनातून सिद्ध झालेल्या निष्कर्षांनुसार, जिममध्ये अनेक तासन्तास खर्च करण्याऐवजी एका ठराविक वेळेत जास्त व्यायम करा. असं केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया विश्वविद्यालयातील रिसर्चने या विषयावर एक संशोधन केलं. यामध्ये त्यांनी लोकांचे दोन गट केले. एका टिमला दोन मिनिटांसाठी सतत वेगाने सायकल चालवण्यासाठी सांगितले. तर दुसऱ्या टिमला अर्ध्या तासासाठी आरामात सायकल चालवण्यास सांगितले.
रिसर्चमधून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, ज्या व्यक्तींनी 2 मिनिटांसाठी वेगाने सायकल चालवली होती. त्यांचं वजन लवकर कमी झालं होते. याच आधारावर संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की, जर लोक फक्त दोन मिनिटांसाठी अधिक वेगाने एक्सरसाइज करत असतील तर बराच वेळ एक्सरसाइज करणाऱ्यांच्या तुलनत त्यांना जास्त फायदा होतो.