शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

टाईप ४ डायबिटीसबद्दल तुम्हाला माहित आहे का? लक्षणं अन् त्रास आहेत अत्यंत गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 2:58 PM

काही लोकांना टाइप 3 आणि टाइप 4 मधुमेहाचा त्रास होतो. तुम्हाला टाइप 4 मधुमेहाबद्दल माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या वयोगटातील लोकांना या मधुमेहाचा त्रास होतो आणि त्याचे कारण काय आहे.

आजच्या युगात मधुमेह ही सर्वात मोठी आरोग्य समस्या बनली आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मधुमेहाचा शरीराच्या सर्व भागांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे हृदयविकार, मानसिक समस्यांसह इतरही अनेक समस्या उद्भवतात. मधुमेहाचे अनेक प्रकार आहेत. बहुतेक लोक टाइप 2 आणि टाइप 1 मधुमेहास असुरक्षित असतात. काही लोकांना टाइप 3 आणि टाइप 4 मधुमेहाचा त्रास होतो. तुम्हाला टाइप 4 मधुमेहाबद्दल माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या वयोगटातील लोकांना या मधुमेहाचा त्रास होतो आणि त्याचे कारण काय आहे.

टाइप 4 मधुमेह म्हणजे काय?हेल्थलाइनच्या अहवालानुसार, टाइप 4 मधुमेह हा वृद्ध लोकांमध्ये इन्सुलिन प्रतिरोधकतेमुळे होणारा आजार आहे. हा आजार वृद्ध लोकांमध्ये होतो, ज्यांचे वजन जास्त नसते आणि ते सडपातळ असतात. टाईप 2 मधुमेहामागे लठ्ठपणा हा एक प्रमुख घटक मानला जातो, परंतु टाइप 4 मध्ये तसे नाही. याची नेमकी कारणे शोधण्याचा शास्त्रज्ञ सध्या प्रयत्न करत आहेत. वाढत्या वयामुळेही हा आजार होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. 2015 च्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, टाइप 4 मधुमेह रोगप्रतिकारक पेशींच्या अतिउत्पादनामुळेदेखील होऊ शकतो. हा अभ्यास उंदरांवर करण्यात आला.

टाइप 4 मधुमेहाची लक्षणेटाइप 4 मधुमेहाची लक्षणे इतर प्रकारच्या मधुमेहासारखीच असतात. मात्र हे कमी वजन असलेल्या लोकांमध्ये आढळते. म्हणून अंदाज लावणे थोडे कठीण होते. त्याचीही काही लक्षणं आहेत. जी इतर आजारांसारखी दिसतात. त्यामुळे तपासणीनंतरच नेमके निदान कळू शकते. चला त्याच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया.

  • अत्यंत थकवा येणे
  • जास्त भूक आणि तहान
  • धूसर दृष्टी
  • जखम भरून न येणे, जखम बरी न होणे
  • वारंवार मूत्रविसर्जन
  • अचानक वजन कमी होणे

यावर उपचार काय?टाईप 4 डायबिटीजवर आतापर्यंत कोणताही अचूक उपचार सापडलेला नाही. संशोधकांना आशा आहे की ते अँटीबॉडी औषध विकसित करण्यास सक्षम असतील. हे शरीरातील नियामक टी-सेल्सची संख्या कमी करण्यास आणि टाइप 4 मधुमेहावर उपचार करण्यास मदत करू शकते. जोपर्यंत हे औषध विकसित होत नाही, तोपर्यंत डॉक्टर टाइप 2 मधुमेहावरील औषधांसोबत उपचार करत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स