शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

धक्कादायक! फळ-भाज्या सोडून केवळ खात होता 'हे' पदार्थ, दिसणं झालं बंद अन् ऐकायलाही येतं कमी! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 4:05 PM

रिपोर्टनुसार, या मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, या मुलाला रेअर इटिंग डिसऑर्डर आहे.

(Image Credit : mirror.co.uk)

आजच्या धावपळीच्या जीवनात जास्तीत जास्त लोक फास्ट फूड किंवा जंक फूडच्या जाळ्यात अडकत आहेत. फास्ट फूड खाल्ल्याने वजन वाढतं किंवा हार्ट संबंधी समस्या होतात हे सर्वानाच माहीत आहे. पण आता समोर आलं आहे की, सतत जंक फूड खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टीही जाते. ब्रिटनमधून अशीच एक घटना समोर आली आहे.

(Image Credit : independent.co.uk)

Irishpost.Com च्या रिपोर्टनुसार, लंडनमध्ये राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलाची जास्त जंक फूड-फास्ट फूड खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी गेली. इतकेच नाही तर त्याची ऐकण्याची क्षमताही कमी झाली. रिपोर्टनुसार, हा मुलगा गेल्या १० वर्षांपासून सतत फास्ट फूड खात होता. तो रोज ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये चिप्स, बर्गर, प्रोसेस्ड मांस आणि सॉस हे पदार्थ खात होता. ब्रिटनमध्ये फास्ट फूड खाऊन डोळ्यांची दृष्टी जाण्याची ही पहिलीच केस आहे.

मुलाला आहे रेअर इटिंग डिसऑर्डर

(Image Credit : inews.co.uk)

रिपोर्टनुसार, या मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, या मुलाला रेअर इटिंग डिसऑर्डर आहे. मेडिकल सायन्समध्ये याला अवॉइडेंट-रेसट्रिक्टिव फूड इनटेक डिसऑर्डर असं म्हणतात. या मुलाला शाळेत असतानापासून हा आजार आहे. या आजारामुळे त्याला भाज्या आणि फळं खाण्याची आवड होत नव्हती. त्यामुळे तो केवळ जंक फूड खात होता. रेअर इटिंग डिसऑर्डरमुळे या मुलाच्या शरीरात आवश्यक व्हिटॅमिन्सचं प्रमाण कमी झालं होतं. त्यामुळे त्याच्यात न्यूट्रिशनल ऑप्टिक न्यरोपॅथी ही स्थिती निर्माण झाली. 

न्यूरोपॅथीमुळे डॅमेज होता ऑप्टिक व्हेन्स

या न्यूरोपॅथीमुळे डोळ्यांच्या ऑप्टिक व्हेन्स डॅमेज होतात. ज्यामुळे हळूहळू डोळ्यांची दृष्टी कमी होत जाते. जर वेळेवर याची माहिती मिळाली नाही किंवा उपचार केले गेले नाही तर त्या व्यक्तीला डोळ्याने काहीच दिसणार नाही. जंक फूड खाल्ल्यामुळे मुलाची हाडे कमजोर झाली आहेत. 

एक्सपर्ट काय सांगतात?

Irishpost.Com च्या रिपोर्टनुसार,  या मुलाच्या केससंबंधी माहिती Annals of Internal Medicine नावाच्या जर्नलमध्येही प्रकाशित करण्यात आली आहे. Annals of Internal Medicine चे डॉक्टर डेनिस एटन यांनी सांगितले की, 'हेल्थकेअर प्रोफेशनल्स आणि लोकांमध्ये अशा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींबाबत फार कमी जागरूकता आहे, ज्यामुळे डोळ्यांची दृष्टीला नुकसान होतं'.

डेनिस एटन यांच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये लिहिले आहे की, 'या मुलाच्या केसमध्ये नवीन गोष्टी या होत्या की, तो १० वर्षांपासून फास्ट फूडवर जिवंत होता. त्याने फळं खाल्लीत ना भाज्या. सोबतच त्याच्या आजाराची माहितीही फार उशीरा मिळाली. तोपर्यंत त्याच्या डोळ्यांची दृष्टी गेली होती.

टॅग्स :Healthआरोग्यLondonलंडन