- मयूर पठाडेतुमची लाईफस्टाईल बदला.. प्रत्येक गोष्टीला काही वेळ काळ असतो, ती प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळी आणि शक्यतो त्या त्या पद्धतीनं केली, तरच फायदा होतो नाहीतर त्याचे परिणाम आपल्याला याच ‘जन्मात’ भोगावे लागतात, हे अनेकांचं अनेकदा सांगून झालंय...चुकीच्या लाईफस्टाईलनं आपल्या आरोग्याचे कसे तीनतेरा वाजतात हे आता कोणाला सांगायचीही गरज नाही, पण तरीही शास्त्रज्ञांनी आता नवं संशोधन केलंय. हे संशोधन सांगतं, तुमची लाईफस्टाईल जर चुकीची असेल तर तुमची निव्वळ लैंगिक क्षमताच कमी होत नाही, नपुंसकतेच्या दिशेने फार झपाट्याने तुमची वाटचाल होते.चुकीच्या लाईफस्टाईलला आपण सरावलेले असू तर विवाहित तरुण आणि प्रौढांमधील कामेच्छाही कमी होत जाते. त्यामुळे त्यासंदर्भातील उपचार घेणाºयांची संख्याही अलीकडच्या काळात खूपच वेगानं वाढते आहे, असं हे संशोधन सांगतं.अर्थातच ही समस्या जगभरातील साºयाच लोकांना सतावते आहे, पण आत्ता नुकतंच जे संशोधन झालंय, ते आपल्याकडे भारतात. दिल्लीत.२१ ते ४५ या वयोगटातील स्त्री, पुरुषांचे एक सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. त्यांच्या लाईफस्टाईलपासून तर अनेक गोष्टींचा मागोवा त्यात घेण्यात आला.ज्या व्यक्तींचा अभ्यास करण्यत आला, त्यापैकी जवळपास ४८ टक्के लोकांची लाईफस्टाईल चुकीची होती. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जंक फूडचा मोठ्या प्रमाणात मारा, व्यायामाचा पत्ता नाही, झोपण्याच्या वेळाही अत्यंत अनियमित आणि जोडीला धुम्रपान, दारुसारखी व्यसनं. या गोष्टींमुळे ताणतणाव वाढतानाच लैंगिक समस्यांनाही त्यांना मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतंय असं हा अभ्यास सांगतो.लैंगिक समस्यांना सामोरं जावं लागत असल्यामुळे अनेकांमध्ये नैराश्य आलं असल्याचंही तज्ञांचं निरीक्षण असून आपली लाईफस्टाईल लवकरात लवकर सुधारणं हा त्यावरचा सर्वाेत्तम मार्ग आहे असंही त्यांचं म्हणणं आहे.
चुकीची लाईफस्टाईल वाढवतेय लैंगिक समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 5:40 PM
नपुंसकतेच्या दिशेनं अनेकांची वाटचाल
ठळक मुद्दे चुकीच्या लाईफस्टाईलमुळे विवाहित तरुण आणि प्रौढांमधील कामेच्छा कमी होत जाते.लैंगिक समस्या वाढतात.अनेकांना नैराश्य येतं.