Healthy Tips: सामान्यपणे लघवीचा रंग हलका पिवळा असतो. पण कधी कधी डार्क पिवळ्या रंगाची लघवी होते. खासकरून उन्हाळ्यात लघवीचा रंग अधिक पिवळा दिसू लागतो. पण याचं कारण अनेकांना माहीत नसतं. मुळात शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याची नॅचरल पद्धत म्हणजे लघवी आहे. अनेकदा लघवीच्या रंगावरूनही तुमच्या आरोग्याबाबत खुलासे होतात. लघवीचा रंग बदलणं हा अनेक गंभीर आजारांचा संकेतही असू शकतो.
उन्हाळ्यात पिवळ्या रंगाची लघवी
उन्हाळ्यात बऱ्याच लोकांना डार्क पिवळ्या रंगाची लघवी येते. पण जर सगळ्याच ऋतुंमध्ये तुम्हाला ही समस्या होत असेल तर हा संकेत धोकादायक आहे. कारण डिहायड्रेशन (Dehydration), काविळसहीत अनेक गंभीर समस्यांमध्ये लघवीचा रंग जास्त पिवळा होतो आणि भरपूर पाणी पिऊनही रंग पिवळाच राहतो.
यूरोलॉजिस्टनुसार, लघवीचा रंग पिवळा होणं फार कॉमन समस्या आहे आणि जास्तीत जास्त लोकांना ही समस्या होते व नंतर लोक बरेही होतात. तर काही लोकांमध्ये ही समस्या गंभीर आजाराचा संकेत असू शकतो.
पुरेसं पाणी न प्यायल्या कारणाने लघवीचा रंग पिवळा होतो. जेव्हा लोक भरपूर पाणी पितात तेव्हा लघवीचा रंग नॉर्मल होऊ लागतो. अनेकदा औषधं खाल्ल्यामुळेही लघवीचा रंग पिवळा होतो. पण काही वेळाने तो सामान्य होतो.
डॉक्टरांनुसार, अनेकदा लघवीचा रंग लाल होतो जो आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा संकेत असू शकतो. जर कुणाला लाल रंगाची लघवी येत असेल तर त्यांनी लगेच डॉक्टरांकडे जाऊन टेस्ट करावी. अनेकदा काही लोकांच्या लघवीतून रक्तही येऊ लागतं. जर तुमच्या लघवीचा रंग लाल असेल तर हा किडनी स्टोन, यूरेटर स्टोन आणि लघवीच्या पिशवीत कॅन्सरचा संकेत असू शकतो. अशात वेळीच डॉक्टरांना भेटा आणि योग्य ते उपचार घ्या.