आपल्या शरीरात अनेक भाग आहेत. ते त्यांचं कार्य करत असतात. त्यापैकीच एक यूरिनरी ट्रॅक्ट आहे. जे शरीरातील मूत्र बाहेर फेकण्याचं काम करतं. पुरुषांमध्ये किडनी जवळ हा भाग असतो. तिथेच मूत्राशय आणि यूरेथरा ही असते. त्यातूनच लघवीचं किडनीपासून ब्लॅडरपर्यंत वहन होतं.
युरेथ्रा ही एक सिंगल ट्यूब असते. मूत्राशयाद्वारे आपल्या लघवीला प्रोस्टेट आणि लिंगाच्या आतड्यांपर्यंत घेऊन जाते. अशावेळी तुमच्या यूरिनरी ट्रॅक्टमध्ये बॅक्टेरिया जमा झाल्यास इन्फेक्शन होते. साधारणपणे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा प्रकार अधिक दिसतो.
यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचे प्रकारडॉक्टर यूरनरी ट्रॅक्टला (UTI) दोन पद्धतीने पाहतात. पहिला अप्पर आणि दुसरा लोअर. जेव्हा तुमच्या वरच्या भागात इन्फेक्शन होतं. तेव्हा किडनी किंवा मूत्रपिंडाची समस्या उद्भवते. दुसरीकडे लोअर संक्रमण झाल्यास ते प्रोस्टेट आणि ब्लॅडरमध्ये होतं.
UTIचे लक्षणतुम्हाला इन्फेक्शन कुठे झाले आहे यावरून यूरिनरील ट्रॅक्ट इन्फेक्शनची लक्षणं ठरतात. त्याची लक्षण या प्रकारे आहेत.
- वारंवार लघवीला येणं
- वारंवार लघवी आल्यासारखं वाटणं
- लघवी केल्यानंतर वेदना होणं, जळजळ होणं, अस्वस्थ वाटणं
- पोटाच्याखाली वेदना होणं
- अंथरुणातच लघवी करणं
- लघवीची दुर्गंधी येणं
- लघवीवाटे रक्त जाणं
- ताप येऊन घबराहट होणं
- हात किंवा पाठीच्या वरच्या भागात वेदना होणं
यूटीआयचं निदानयूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनतं निदान होण्यासाठी डॉक्टर तुम्हाला काही प्रश्न विचारतात. त्यानंतर यूरीन टेस्ट करून यूटीआयच्या समस्येचं निदान करतात. ही समस्या प्रोस्टेटशी संबंधित असेल तर तुम्हाला एक्सरे किंवा अल्ट्रा साऊंडही करावी लागू शकते. त्यातून तुमचा यूरनरी ट्रॅक्ट डॉक्टरांना समजू शकतो.
अँटीबायोटिक औषधांची मदततुमच्या आरोग्याची माहिती घेऊन डॉक्टर तुमच्या उपचाराची प्रक्रिया सुरू करतात. यूटीआयसाठी सामान्यपणे लोकांना अँटीबायोटिक औषधे दिली जातात. कमीत कमी एक आठवडा आणि अधिकाधिक दोन आठवड्यासाठी ही औषधे घ्यावी लागतात. अनेकदा अँटीबायोटिक आयव्हीद्वारे दिली जातात. मात्र, त्याचं प्रमाण खूप कमी आहे. अधिकाधिक लोकांना केवळ अँटिबायोटिक औषधांचं सेवनच करावं लागतं.
यूटीआयचं कारणमूत्राशयातील यूटीआयची समस्या हा तारुण्यातील आजाराशी संबंधित आजार आहे. क्लैमायडिया आणि गोनोरिया हे आजार याचे मुख्य उदाहरण आहेत. तरुणांमध्ये ही समस्या सर्वाधिक असते. या शिवाय प्रोस्टेट ग्रंथीच्या काही समस्येमुळेही यूटीआयची समस्या निर्माण होते. एका ठरावीक वयानंतर पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येते. वाढलेले प्रोस्टेट याला कारणीभूत ठरतात.
किडनीपर्यंत इन्फेक्शन वाढू शकतंवेळीच यूटीआयच्या समस्येवर उपचार घेतला नाही तर हा आजार किडनीपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. त्यानंतर किडनीवर उपचार करावा लागतो. मात्र, अत्यंत कमी प्रकरणात ही समस्या दिसून येते. मात्र, अनेकदा या आजारामुळे किडनी खराबही होऊ शकते. किडनीची समस्या निर्माण झाल्यास रक्ताचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे सेप्सिस होऊ शकतो. अशावेळी तुम्ही स्वत:ला आजारी समजू शकता. त्यामुळे वेळीच उपचार होणं आवश्यक आहे.