किडनीच्या माध्यमातून आपल्या शरीरातून विषारी तत्व बाहेर काढले जातात. म्हणजे किडनीतील नेफरोन्स फिल्टरप्रमाणे काम करतात. यातून रक्त शुद्ध होतं आणि शरीरातील विषारी तत्व लघवीच्या माध्यमातून बाहेर पडतात. त्यासोबतच किडनीने लाल रक्तपेशी तयार होण्यासही मदत मिळते आणि असे हार्मोन्स रिलीज केले जातात ज्याने ब्लड प्रेशर कंट्रोल राहण्यास मदत मिळते. पण अनेकदा किडनीची काही समस्या झाल्याने शरीराच्या क्रिया व्यवस्थित होत नाहीत आणि मग वेगवेगळे आजार होतात.
सुरूवातीला किडनीची समस्या लगेच लक्षात येत नाही. पण पुढे जाऊन किडनीची समस्या फारच त्रायदायक ठरते. पण तेव्हा बराच उशीर झालेला असतो. अशात आता वैज्ञानिकांनी रिसर्च केलाय. ज्यानुसार एका स्वस्त उपचारातून तुम्ही हे जाणून घेऊ शकता की, तुम्हाला भविष्यात किडनीचा आजार होणार की नाही. हा उपचार किडनीचा आजार ओळखण्यात सक्षम असेल.
सॅन फ्रन्सिस्कोतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या वैज्ञानिकांनी हे परिक्षण विकसित केलं आहे. जे किडनीच्या समस्यांनी पीडित रूग्णांच्या लघवीतूल जास्त प्रोटीनचं प्रमाण मोजून हे सांगू शकेल की, त्यांना भविष्यात किडनीसंबंधी गंभीर आजार होणार आहे की नाही. या परिक्षणामुळे अनेक रूग्णांना डायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लांट करण्याची गरज पडणार नाही.
प्रोटीनमुळे येईल खरं समोर
या रिसर्चचे मुख्य वैज्ञानिक चिवुआन म्हणाले की, 'लघवीमध्ये असलेलं अत्याधिक प्रोटीन भविष्यात होणाऱ्या किडनीच्या आजाराचं संकेत असतं. पण याचा वापर किडनी इंज्यूरी असलेल्या रूग्णांवर केला जाऊ शकत नाही. ही एक स्वस्त आणि कोणतीही चिरफाड नसणारी प्रक्रिया आहे. किडनीच्या समस्येतून एकदा बाहेर आल्यावर अनेकांना नेहमीच पुन्हा समस्या होतात. इतकेच नाही तर अनेकांना किडनी फेल, हृदयरोगाच्या समस्या होतात आणि काहींना मृत्यूचा धोकाही होऊ शकतो.