कोरोना व्हायरसच्या माहामारीने भारतासह जगभरातील देशांमध्ये हाहाकार पसरवला आहे. दरम्यान कोरोनाच्या औषधाबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. अमेरिकन औषध तयार करणारी कंपनी इली लिली(Eli Lilly) ने घोषणा केली आहे की, कोविड १९ चे औषध LY-CoV555 हे चाचणीच्या तिसऱ्या टप्यात पोहोचले आहे. या चाचणीत अमेरिकेतील संक्रामक रोग संस्थानांचा सुद्धा सहभाग असणार आहे.
तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठी २ हजार ४०० लोकांचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. या चाचणीसाठी रुग्णालयातील कर्मचारी तसंच कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून बाहेर आलेल्या लोकांचा समावेश असणार आहे. या चाचणीत सहभागी होत असलेल्या लोकांना LY-CoV555 या औषधाचा डोस दिला जाणार आहे. या औषधाने कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी SARS-CoV-2 स्पाईक प्रोटीन्सविरुद्ध एंटीबॉडी विकसित केल्या जातील.
संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस माणसाच्या शरीरात स्पाईक प्रोटीन्सच्या माध्यमातून शिरकाव करतो. LY-CoV555 हे औषध कोरोना व्हायरसला माणसांच्या शरीरात जाण्यापासून रोखतं. या संशोधनाचे प्रमुख अधिकारी डेनिअल स्कोवरोंस्की यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचा नर्सिंग होममध्ये राहत असलेल्या लोकांवर वाईट परिणाम होत आहे. कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी या औषधावर वेगाने काम सुरू आहे.
डेनिअल यांनी पुढे सांगितले की क्लिनिकल ट्रायल करणं तितकं सोपं नाही. तरीही आम्ही हे आव्हान स्वीकारलं आहे. जेणेकरून गरजवंतांची मदत करता येऊ शकेल. जगभरात कोरोना विषाणूंमुळे आतापर्यंत ७ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापासून बचावसाठी जगभरातील कंपन्या प्रयत्न करत आहेत.
दरम्यान भारत आणि चीनमध्ये बीसीजीचे राष्ट्रीय लसीकरण अभियान सुरुवातीपासून आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळेच कोरोनाचा मृत्यूदर या देशांमध्ये कमी आहे. बीसीजी लसीमुळे कोरोना विषाणूंशी निगडीत असलेल्या समस्यांपासून बचाव करण्याासाठी मदत होते. बीसीजीची लस जन्मल्यानंतर १५ दिवसांच्या आत लहान मुलांना दिली जाते. त्यामुळे संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो.
भारतातही कोरोना रुग्णांवर बीसीजी लसीचे क्लिनिकल ट्रायल सुरू केले आहे. याअंतर्गत २५० रुग्णांना बीसीजी लस देण्यात येणर आहे. याचे परिणाम दिसून येण्यासाठी २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. साइंस एडवांसेज जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या रिपोर्टनुसार बीसीजी लसीने कमीत कमी पहिल्या ३० दिवसात पसरत असलेल्या कोरोना संक्रमणाचा वेग कमी करू शकतो.
चिंताजनक! आता कोरोना विषाणू दीर्घकाळ पाठ सोडणार नाही; WHO ची धोक्याची सुचना
पावसाळ्यात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; रोगप्रतिकारकशक्ती होईल कमी, वेळीच सावध व्हा