Diabetes Reason : डायबिटीस हा एक वेगाने वाढणारा आणि उपचार नसलेला एक गंभीर आजार आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात या आजाराच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डायबिटीस होण्याची अनेक कारणे आहेत, अनहेल्दी लाइफस्टाईल आणि अनहेल्दी डाएट याची मुख्य कारणे मानली जातात.
नुकताच अमेरिकेच्या टफ्ट्स यूनिवर्सिटीच्या फ्रीडमॅन स्कूल ऑफ न्यूट्रिशन सायन्स अॅन्ड पॉलिसीच्या अभ्यासकांनी आपल्या रिसर्चमधून टाइप 2 डायबिटीसच्या (type 2 diabetes) दोन मोठ्या कारणांचा शोध लावला. चिंतेची बाब ही आहे की, दोन्ही कारणे तुमच्या रोजच्या खाण्या-पिण्याच्या सवयीतील आहेत. त्यांनी सांगितलं की, खाण्याच्या दोन गोष्टींमुळे जगभरात डायबिटीसच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. चला जाणून घेऊ ही दोन कारणे...
70 टक्के वाढल्या नवीन केसेस
नेचर मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, 2018 मध्ये खाण्याच्या सवयींमुळे जगभरात डायबिटीसच्या केसेस वेगाने वाढल्या आणि नव्या केसेसमध्ये जवळपास 70.3 टक्के वाढ बघायला मिळाली.
कोणत्या दोन गोष्टींमुळे वाढतोय डायबिटीस
अभ्यासकांनी सांगितलं की, रिफाइंड तांदूळ आणि गव्हाच्या अधिक सेवनाने आणि आहारात कडधान्याची कमतरता यामुळे टाइप 2 डायबिटीसच्या केसेसमध्ये वाढ होऊ शकते. त्यांनी हे सांगितलं की, कार्बोहायड्रेटची खराब गुणवत्ता आफ्रिका, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये डायबिटीसच्या केसेस वाढत आहेत.
कोणत्या गोष्टींमुळे 60 टक्के वाढला डायबिटीस
रिसर्चमधून समोर आलं की, रिफाइंड तांदूळ, गहू, रिफांइड मीट, अनप्रोसेस्ड रेड मीट, शुगरी ड्रिंक्स, बटाटे आणि फळांचा रस यांच्या अधिक सेवनाने डायबिटीसच्या केसेस 60 टक्के वाढल्या आहेत.
वैज्ञानिकांनी शोधली डायबिटीस वाढण्याची 11 कारणे
1) कडधान्याचं कमी सेवन
2) रिफाइंड धान्याचं अधिक सेवन
3) प्रोसेस्ड मीटचं अधिक सेवन
4) अनप्रोसेस्ड रेड मीटचं अधिक सेवन
5) दह्याचं कमी सेवन
6) साखरेपासून बनवलेल्या गोड पेय पदार्थांच अधिक सेवन
7) बटाट्यांचं अधिक सेवन
8) फळांचं सेवन कमी करणे
9) नट आणि सीड्सचं कमी सेवन
10) स्टार्च नसलेल्या भाज्यांचं कमी सेवन
11) फळांच्या रसाचं अधिक सेवन
सिंपल कार्ब्स ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढवतात
सिंपल कार्बोहायड्रेट जसे की, सोडा, कोल्ड ड्रिंक्स, बेक्ड फूड आणि रिफाइंड फूड्स कॉम्प्लेक्स कार्ब्सच्या तुलनेत लवकर पचतात आणि अधिक सहजपणे अॅब्जॉर्ब होतात. शुगरच्या रूग्णांना या सगळ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.