Ajwain For Weight Loss: आजकाल वेगवेगळ्या कारणांमुळे लोकांचं वजन वेगाने वाढत आहे. वजन वाढलं की, वेगवेगळे आजार शरीरात घर करतात. चुकीची लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांचं वजन वाढू लागलं आहे. अशात बरेच लोक वेगवेगळे उपाय करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही. अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने ते वजन कमी करू शकतात.
किचनमध्ये ठेवलेले मसालेही वजन करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यातील एक मसाला म्हणजे ओवा. ओव्याच्या मदतीने तुम्ही वजन कमी करू शकता. तसेच याच्या सेवनाने आरोग्यालाही इतर अनेक फायदे मिळतात. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, वजन कमी करण्यासाठी ओव्याचा वापर कसा करावा.
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, ओव्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यात थायमोल तत्व असतं जे पचन तंत्र चांगलं ठेवण्यास मदत करतं. सोबतच मेटाबॉलिज्मही मजबूत होतं आणि मग वजन कमी करण्यास मदत मिळते. त्यासोबतच ओव्यात भरपूर फायबर असतं. जे वजन कंट्रोल करण्यास मदत करतं.
ओवा आणि तुळशीचं पाणी
ओवा आणि तुळशीचं पाणी प्यायल्याने वजन कमी होतं. याने तुम्हाला जास्त मेहनत करण्याचीही गरज पडणार नाही. एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी घ्या. यात एक चमचा ओवा आणि थोडी तुळशीची पाने टाका. आता हे पाणी चांगलं उकडून घ्या. नंतर हे पाणी थंड होऊ द्या आणि कोमट असताना याचं सेवन करा. याने पोटातील गॅस, अपचन, बद्धकोष्ठता या समस्याही दूर होतात.
ओवा आणि लिंबू पाणी
सकाळी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा ओवा टाकून उकडून घ्या. यात थोडा लिंबाचा रस टाका आणि सेवन करा. याने तुमचं मेटाबॉलिज्म मजबूत होतं. याच्या नियमित सेवनाने तुमचं वाढलेलं वजन कमी होईल.
ओव्याचा चहा
एक कप पाण्यात अर्धा चमचा ओवा टाकून उकडून घ्या. काही वेळाने पाणी एका कपमध्ये टाका आणि त्यात अर्धा चमचा मध टाका. याचं सेवन करून तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.