आपण अनेकदा टिफीन नेत असताना किंवा जेवण ठेवण्यासाठी एल्युमिनियम फॉईल पेपरचा वापर करत असतो. एल्युमिनियम फॉईल किचनमध्ये सर्रास वापरात असलेली वस्तू आहे. पण तज्ञांच्यामचे फॉईलपेपरचा वापर योग्यप्रकारे करण्यात आला नाही तर आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला फॉईल पेपरच्या वापरामुळे कोणत्या गंभीर परीणामांचा सामना करावा लागतो याबद्दल सांगणार आहोत.
खाद्यपदार्थ दुषित होऊ शकतात
जेव्हा आपण रोज जेवण फॉईल पेपरमध्ये पॅक करत असतो. तेव्हा एल्युमिनियम फॉईल पेपरमध्ये आंबट पदार्थ किंवा भाज्या पॅक करता कामा नये. कारण आंबट पदार्थ आणि मसालेदार भाज्या यांच्या संपर्कात आल्यानंतर एल्युमिनियम केमिकल रिएक्शन करत असतो. त्याचा नर्वस सिस्टिमवर नकारात्मक परिणाम होत असतो. पण मसालेदार पदार्थ त्यात पॅक करू नका.
इनफर्टिलिटी
एका रिपोर्टनुसार जर कोणताही पुरूष फॉईल पेपरमध्ये अधिकवेळ असलेल्या खाण्याचं सेवन करत असेल तर इनफर्टिलिटीची समस्या उद्भवू शकते. यासाठी ६० लोकांवर रिसर्च करण्यात आला होता. त्यात असं दिसून आलं की फॉईल पेपरमुळे स्पर्मची संख्याची कमी व्हायला लागते.
हाडं आणि किडनीचं दुखणं
जर रोज एल्युमिनिुयम फॉईलचा वापर जेवण ठेवण्यासाठी करत असाल आणि त्या पदार्थांचं सेवन करत असाल तर हळूहळू हाडं कमजोर व्हायला लागतात. त्यामुळे किडनीच्या फंक्शनवर सुद्धा नकारात्मक परिणाम परिणाम होत असतो.
मेंटल हेल्थ
फॉईल पेपरचा वापर सतत केल्यामुळे मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम घडून येत असतो. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इंफॉर्मेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार मानसिक आरोग्य बिघडण्यासह, अल्झायमरची समस्या सुद्धा उद्भवू शकते. अनेकदा केमिकल्सची रिएक्शन झाल्यामुळे शरीरातील पेशींचा विकास थांबतो आणि शारीरिक स्थिती सुद्धा खराब होऊ शकते. ( हे पण वाचा-Coronavirus : फुप्फुसं नाही तर 'या' अवयवाला सर्वातआधी शिकार करतो कोरोना? जाणून घ्या उपाय!)
फॉईल पेपरचा वापर करताना अशी घ्या काळजी
जास्त गरम जेवण एल्युमिनियम फॉईलमध्ये रॅप करू नका.
एसिडीक, आंबट तसंच मसालेदार पदार्थ एल्युमिनियम फॉईलमध्ये रॅप करू नका.
मायक्रोव्हेव किंवा एल्युमिनियम फॉईलचा वापर करताना विषेश खबरदारी घेणं गरजेचं आहे. ( हे पण वाचा- खरंच दातांना तार लावणं फायद्याचं असतं का? कशी घ्याल काळजी...)