‘टी बॅग्ज’चा करता येतो असाही वापर; तुम्हाला ठाऊक आहेत का ‘टी बॅग्ज’चे हे फायदे ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2017 5:40 AM
रोज सकाळी उठल्यानंतर मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंग केल्यानंतर हल्ली टी बॅग्जमधील ग्रीन टी घेतो. बॅग्ज पाण्यात बुडवल्यावर त्यातील सर्व चहापत्ती पाण्याला मस्त कलर आणते. पण, त्यानंतर आपण त्या बॅग्ज काढून कचरापेटीत टाकून देतो.
हेल्दी आरोग्यासाठी आपण आता ग्रीन टी किंवा ब्लॅक टी यांना प्राधान्य देतो. रोज सकाळी उठल्यानंतर मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंग केल्यानंतर हल्ली टी बॅग्जमधील ग्रीन टी घेतो. बॅग्ज पाण्यात बुडवल्यावर त्यातील सर्व चहापत्ती पाण्याला मस्त कलर आणते. पण, त्यानंतर आपण त्या बॅग्ज काढून कचरापेटीत टाकून देतो. आता मुद्दा हाच आहे की, आपण या टीबॅग्ज टाकून का देतो? त्यांचा पुर्नवापर करता येतो हे आपल्याला ठाऊकच नसतं. तुम्हाला जाणून घ्यायचेत का काय आहेत टीबॅग्जचे फायदे...1. सुंदर दिसण्यासाठी :* वापरलेल्या टी बॅग आणि सौंदर्य खुलवणं याचा काय संबंध असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल पण, टी बॅगचा वापर करून तुम्ही सौंदर्य खुलवू शकता.* वापरलेल्या टी बॅग पुन्हा गरम पाण्यात बुडवून त्या पाण्यात काही काळ पाय बुडवून तुम्ही घरच्या घरी फूट स्पा घेऊ शकता. पायाची दुर्गंधी कमी होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.* शेव्हिंग केल्यानंतर चेहऱ्याची आग होते, ती क्षमवण्यासाठी पाण्यात ओली केलेली टी बॅग तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.* तुमचे केस रुक्ष आणि निस्तेज झाले असतील तर टी बॅग गरम पाण्यात मिसळवून त्या पाण्याने केस धुवावे. 2. दुर्गंधी घालवण्यासाठी : * अनेकदा शूजमधून येणाऱ्या दुर्गंधीने अनेक जण त्रस्त असतात, थंडीत आणि उन्हाळ्यात याचे प्रमाण जरा जास्तच असते अशावेळी आपण डिओड्रंट शूजमध्ये मारतो आणि तात्पुरती वेळ निभावून नेतो, पण अशा वेळी टी बॅगचा वापर तुम्ही करू शकता. वापरलेली टी बॅग धुवून सुकवून घ्या आणि ही टी बॅग शूजमध्ये रात्रभर ठेवा. टी बॅग दुर्गंधी आणि शूजमधला ओलावा शोषून घेते.* जिम बॅगमधली दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही टी बॅगचा वापर करू शकता. बॅगच्या एका कोपऱ्यात टी बॅग ठेवली तर लवकरच बॅगमधून येणारी दुर्गंधी कमी होईल.* फ्रिजमध्ये आपण अनेक पदार्थ ठेवतो, भाज्या, फळं, ज्यूस, मांस आणि इतर अन्नही या सगळ्यांचा वास फ्रिज उघडल्या उघडल्या येतो किंवा अनेकदा कुबट वासही येतो अशावेळी वापरलेल्या टी बॅग फ्रिजच्या कोप-यात ठेवल्यावर दुर्गंधी दूर होते.3. खत निर्मितीसाठी : * तुमच्या बाल्कनीत असलेल्या झाडांची काळजी घेण्यासाठी तुम्ही वापरलेल्या टी बॅगचा वापर करू शकता. टी बॅग पुन्हा पाण्यात बुडवून ते पाणी तुम्ही झाडांना घालू शकता. या टी बॅगपासून तुम्ही कंम्पोस्ट खत बनवू शकता.4. फर्निचरची साफसफाई करण्यासाठी : * बॅग पाण्यात घोळून घ्यावी. या पाण्यात कापड भिजवून त्याने फर्निचर साफ केल्यास त्यांना चांगली चकाकी येते.