(Image Creadit : divinehomecare.com)
बऱ्याचदा हवामानात झालेल्या बदलांमुळे सर्दी-पडशासारखे आजार जडतात. अनेक औषधं करूनदेखील सर्दीपासून सुटका मिळत नाही. त्यामुळे नाक बंद होतं. त्यामुळे श्वास घेण्यासही त्रास होतो. सतत शिंका येणं आणि सततची डोकेदुखी यांमुळेही हैराण व्हायला होतं. त्यामुळे आज जाणून घेऊयात असे काही घरगुती उपाय ज्यांचा उपयोग करून तुम्ही बंद नाक मोकळं करू शकता.
1. जर सर्दी-पडश्यामुळे तुमचं नाक बंद झालं असेल तर सफरचंदाचे व्हिनेगर त्यावर गुणकारी ठरते. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मध आणि दोन चमचे सफरचंदाचं व्हिनेगर मिक्स करून प्यायल्याने तुमचं सर्दीमुळे बंद झालेलं नाक मोकळं होतं.
2. एक चमचा लिंबाच्या रसामध्ये थोडं मध मिक्स करा आणि दररोज सकाळी-संध्याकाळी थोडं थोडं घ्या. याचं सेवन केल्यानं बंद नाकाची समस्या दूर होईल. हे सर्दीवरही गुणकारी ठरतं.
3. सर्दी-पडशासारख्या समस्यांमध्ये खोबऱ्याचं तेलं औषधी ठरतं. खोबऱ्याचं तेल आपल्या बोटांवर घेऊन ते नाकामध्ये लावा. खोबऱ्याच्या तेलामध्ये कापूर घालूनही तुम्ही लावू शकता. असं केल्यानं बंद नाकं मोकळं होतं.
4. हळदीमध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टीबॅक्टेरिअल गुण असतात. जे सर्दी-पडश्यावर गुणकारी ठरतात. एक ग्लास दुधामध्ये एक चमचा हळद मिक्स करून प्यायल्याने बंद नाकाची समस्या दूर होते.